एक्स्प्लोर

OCCRP Report : हिंडनबर्गसारखा खळबळ उडवणारा अहवाल येणार? भारतीय कंपनीच्या व्यवहाराचा गौप्यस्फोट होणार?

OCCRP To Expose Well Known Indian Corporate : अदानी समूहावर गैरव्यवहाराचे आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्गने प्रकाशित केला होता. त्यानंतर आता, तसाच एक अहवाल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली अमेरिकेतील संशोधन संस्था हिंडेनबर्ग फर्मने अदानी समूहात कथित घोटाळा झाला असल्याचा दावा करणारा अहवाल प्रकाशित केला. त्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठा भूकंप आला. हिंडेनबर्गचा अहवाल जानेवारी महिन्यात प्रकाशित झाल्यानंतरच्या आठ महिन्यानंतरही त्याचे धक्के जाणवत आहेत. हिंडेनबर्गचा परिणाम अजूनही जाणवत असताना दुसरीकडे आता देशातील काही कॉर्पोरेट घराण्यांबाबत एक अहवाल प्रकाशित होणार असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. यामध्ये काही कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवहार समोर येणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

देशातील काही कॉर्पोरेट घराणे निशाण्यावर...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट नावाची एक स्वयंसेवी संस्था भारतातील काही कॉर्पोरेट घराण्यांबाबत मोठे गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या गौप्यस्फोटात संबंधित कॉर्पोरेट हाऊसच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीत परदेशी फंडांचा सहभाग असल्याची चर्चा असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अमेरिकन आर्थिक संशोधन आणि गुंतवणूक कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता, नव्याने येणाऱ्या अहवालामुळे भारतीय कॉर्पोरेट क्षेत्र, भांडवली बाजाराला धक्का बसू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

अहवाल की बातम्यांची मालिका?

या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन सूत्रांनी सांगितले की,  शोध पत्रकारिता करणाऱ्यांचा मंच असल्याचा दावा करणाऱ्या OCCRP कडून भारतीय उद्योजक घराण्यांबाबत एखादा अहवाल अथवा बातम्यांची मालिका प्रकाशित करू शकतात. OCCRP ला ई-मेलद्वारे काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही उत्तरे मिळाली नाहीत .

OCCRP म्हणजे काय

संस्थेच्या वेबसाइटनुसार, OCCRP ची स्थापना 2006 मध्ये झाली आणि ही संस्था संघटीत गुन्हेगारीबद्दल अहवाल देण्यात तज्ज्ञ असल्याचा दावा करते. काही माध्यमांसोबतच्या भागिदारीत या संस्थेकडून शोध पत्रकारिता असलेले लेख, बातम्या प्रकाशित केल्या जातात. 

ओपन सोसायटी फाउंडेशन या जॉर्ज सोरोस युनिटला निधी देते. विशेष म्हणजे, जॉर्ज सोरोसच्या OCCRP ला ज्या इतर संस्थांकडून निधी किंवा आर्थिक मदत मिळते त्यात फोर्ड फाऊंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि ओक फाऊंडेशन यांचा समावेश आहे. 

जॉर्ज सेरॉसची ही संस्था त्याच्या संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार उघड करणारे अहवाल प्रकाशित करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. युरोप, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत या संस्थेची केंद्रे आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खाजगी वॉर्डात शिफ्ट करणारSSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Embed widget