(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India GDP Growth : लोकसभा निकालाआधी इकॉनॉमीसाठी खूशखबर, चौथ्या तिमाहीचा GDP 7.8%
India GDP Growth : देशात सध्या सार्वत्रिक निवडणुका सुरु आहेत, एक जून रोजी अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्याआधी अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी आली आहे.
India GDP Growth : देशात सध्या सार्वत्रिक निवडणुका सुरु आहेत, एक जून रोजी अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्याआधी अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.8 टक्के इतका राहिला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.2 टक्के नोंदवला गेला होता. यामध्ये 1.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2024 आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये भारताच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (GDP) मध्ये मोठी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. भारताचा GDP मार्च तिमाहीत 7.8 टक्के वाढला आणि केंद्राने आता FY24 साठी एकूण विकास दर 8.2 टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी (MoSPI) मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) आज शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार होता. भारताने (RBI) 6.9 टक्क्यांचा अंदाज ओलांडला आहे.
Real GDP estimated to grow by 8.2% in FY 2023-24 as compared to the growth rate of 7.0% in FY 2022-23, says Government of India.
— ANI (@ANI) May 31, 2024
Real GVA has grown by 7.2% in 2023-24 over the growth rate of 6.7% in 2022-23
Real GVA and Real GDP have been estimated to grow by 6.3% and 7.8%… pic.twitter.com/32lQMjFqa4
प्रमुख मुद्दे :
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये GDP मध्ये 8.2% च्या वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2022-23 आर्थिक वर्षातील वाढीचा दर 7.0% राहिलाय.
सकल मूल्यवर्धित (GVA) 2022-23 मधील 6.7% च्या तुलनेत 2023-24 मध्ये 7.2% वाढले आहे. 2022-23 मध्ये ते 6.7% इतके होते. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड (GVA) मधील वाढ प्रामुख्याने 2023-24 मध्ये उत्पादन क्षेत्रातील 9.9% राहिली. 2022-23 मध्ये खाण आणि उत्खनन क्षेत्रातील 1.9% वाढीमुळे फायदा झाला. 2023-24 मध्ये 7.1% ची वाढ हे देखील याचे कारण होते.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत GVA आणि GDP अनुक्रमे 6.3% आणि 7.8% ने वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी GVA आणि GDP मधील वाढीचा दर अनुक्रमे 8.0% आणि 9.9% असा अंदाज आहे.