(Source: Poll of Polls)
दर तासाला गौतम अदानी कमवतात 45 कोटी रुपये, वर्षभरात संपत्ती झाली दुप्पट
दिवसेंदिवस उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Net Worth) मोठी वाढ होताना दिसत आहे. गौतम अदानी हे दर तासाला 45 कोटी रुपये कमवतात. त्यांची एकूण संपत्ती एका वर्षात दुप्पट झाली आहे.
Gautam Adani Net Worth: देशातील बड्या उद्योगपतीपैकी गौतम अदानी (Gautam Adani) हे एक आहेत. सध्या दिवसेंदिवस उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत (Net Worth) मोठी वाढ होताना दिसत आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर गौतम अदानी यांची संपत्ती 40 अब्ज डॉलरच्या खाली गेली होती. पण सध्या त्यांची संपत्ती अंदाजे 106 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गौतम अदानी हे दर तासाला 45 कोटी रुपये कमवतात. त्यांची एकूण संपत्ती एका वर्षात दुप्पट झाली आहे.
सध्या गौतम अदानींची संपत्ती 106 अब्ज डॉलर
देशातील आघाडीचा व्यावसायिक समूह अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी मागील वर्ष खूप चांगलं गेलं आहे. हिंडेनबर्ग अहवालाच्या धक्क्यातून सावरताना अदानी समूहाच्या कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी गौतम अदानी यांची संपत्ती 58.52 अब्ज डॉलर होती. आता ती वाढून 106 अब्ज डॉलर झाली आहे. ते दर तासाला 45 कोटी रुपये कमवत आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या संपत्तीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
चालू वर्षात गौतम अदानींच्या संपत्तीत 25 टक्क्यांची वाढ
दरम्यान, गेल्या वर्षभरात अदानी समूहाने चांगली कामगिरी केली आहे. कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. या वाढीसोबतच गौतम अदानी यांचे मूल्यांकनही वाढले आहे. गौतम अदानी यांच्या 61 व्या वाढदिवसापासून ते 62 व्या वाढदिवसापर्यंत त्यांची एकूण संपत्ती 82 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 40 अब्ज डॉलरच्या खाली गेली होती. तेव्हापासून त्यांची एकूण संपत्ती सतत वाढत आहे. चालू वर्षातच गौतम अदानी यांच्या संपत्तीत जवळपास 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही मोठी वाढ आहे.
वर्षभरात संपत्तीत 48 अब्ज डॉलर्सची वाढ
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 24 जून 2023 रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 58.2 अब्ज डॉलर होती, जी आता 106 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती सुमारे 48 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. याचा अर्थ गेल्या एका वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत दर तासाला 45.74 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2024 या चालू वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 21.3 अब्ज डॉलर म्हणजेच 1.77 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. याचा अर्थ अदानींच्या संपत्तीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, गौतम अदानी सध्या जगातील 14 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीतही त्यांचा समावेश आहे. त्यांच्या वर भारताचे मुकेश अंबानी आहेत. मुकेश अंबानी हे जगातील 12 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! अदानी समुहाचा मोठा निर्णय, भूतानमध्ये उभारणार 570 मेगावॅटचा ग्रीन हायड्रो प्रकल्प