मोठी बातमी! गौतम अदानींचं साम्राज्य आणखी वाढलं, 1551 कोटी रुपयांना खरेदी केली नवीन कंपनी
उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी 1551 कोटी रुपयांना एक कंपनी खरेदी केली आहे. 15 वर्षे जुनी असलेल्या कंपनीची त्यांनी खरेदी केलीय. पाहुयात याबाबत सविस्तर माहिती.
Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्यवसायत मोठी प्रगती केल्याचं चित्र दिसत आहे. अलीकडेच त्यांनी कंपनीन्या QIP च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये उभे केले आहेत. आता त्यांनी 1551 कोटी रुपयांना एक कंपनी खरेदी केली आहे. 15 वर्षे जुनी असलेल्या कंपनीची त्यांनी खरेदी केलीय. पाहुयात याबाबत सविस्तर माहिती.
दरम्यान, काल अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये किंचित वाढ दिसून आली. आकडेवारीनुसार, बीएसईवर अदानी पोर्ट आणि सेझचे शेअर्स 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 1482.65 रुपयांवर बंद झाले. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या समभागांनी 1487.15 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला आहे.
Astro Offshore या कंपनीत 80 टक्के खरेदी
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) लिमिटेडने Astro Offshore मधील 80 टक्के भागभांडवल 185 दशलक्ष डॉलरला म्हणजेच 1551 कोटी रुपयांना विकत घेण्याचा करार केला आहे. APSEZ ने शुक्रवारी सांगितले की हा करार पूर्णपणे रोखीने आहे. कंपनीने सांगितले की, ॲस्ट्रोचे विद्यमान प्रवर्तक उर्वरित 20 टक्के हिस्सा धारण करतील. कंपनीने सांगितले की, APSEZ ने 185 दशलक्ष डॉलर किमतीच्या सर्व-कॅश डीलमध्ये ॲस्ट्रोमधील 80 टक्के भागभांडवल विकत घेण्यासाठी निश्चित करार केला आहे.
या देशांमध्ये काम करेल
2009 मध्ये स्थापन झालेली ॲस्ट्रो ही पश्चिम आशिया, भारत, सुदूर पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील आघाडीची जागतिक OSV ऑपरेटर आहे. कंपनीने सांगितले की, ॲस्ट्रोकडे 26 ऑफशोर सपोर्ट वेसेल्स (OSV) आहेत. 30 एप्रिल 2024 रोजी संपलेल्या वर्षात Astro ची कमाई $95 दशलक्ष आणि करपूर्व कमाई (Ebitda) 41 दशलक्ष डॉलर होती.
अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये वाढ
शुक्रवारी अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये किंचित वाढ दिसून आली. आकडेवारीनुसार, बीएसईवर अदानी पोर्ट आणि सेझचे शेअर्स 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 1482.65 रुपयांवर बंद झाले. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या समभागांनी 1487.15 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. मात्र, आज कंपनीचे शेअर्स 1477.20 रुपयांवर उघडले. चालू वर्षात अदानी पोर्टचा हिस्सा 435 रुपयांनी म्हणजेच 41.47 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 3.20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.