एक्स्प्लोर

परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घसरण, RBI ने जाहीर केली आकडेवारी

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI)काल (16 फेब्रुवारी 2024) परकीय चलनाच्या साठ्याचा (Foreign Currency Reserves) डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, परकीय चलनसाठ्यात घट झाली आहे.

Foreign Currency Reserves: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI)काल (16 फेब्रुवारी 2024) परकीय चलनाच्या साठ्याचा (Foreign Currency Reserves) डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, परकीय चलनसाठ्यात 5.24 अब्ज डॉलरची घट झाली आहे. सध्या परकीय चलनसाठा 617.23 अब्ज डॉलरवर आला आहे. जो पहिल्या आठवड्यात 622.469 अब्ज डॉलर होता. आरबीआयच्या आकडेवारीनुसार परकीय चलन संपत्तीतही मोठी घट झाली आहे. विदेशी चलन संपत्ती 4.80 अब्ज डॉलरने घसरून 546.52 अब्ज डॉलर झाली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत 

दरम्यान, आरबीआयच्या सोन्याच्या साठ्यातही घट झाली आहे. आरबीआयचा सोन्याचा साठा 350 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 47.73 अब्ज डॉलर झाला आहे. एसडीआरमध्येही घट झाली आहे आणि ती 55 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 18.13 अब्ज डॉलरवर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये जमा केलेल्या साठ्यातही घट झाली आहे. ती 28 दशलक्ष डॉलर्सनी कमी होऊन 4.82 अब्ज डॉलरवर आली आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. रुपया 4 पैशांनी मजबूत झाला आहे. एका डॉलरच्या तुलनेत 83.01 च्या पातळीवर बंद झाला आहे. जो व्यापार सत्रापूर्वी 83.05 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. दरम्यान, ऑक्टोबर 2021 मध्ये, म्हणजे सुमारे अडीच वर्षांपूर्वी, देशाचा परकीय चलनसाठा 645 अब्ज यूएस डॉलरच्या उच्चांकावर होता.

देशांतर्गत चलन स्थिर करण्यासाठी आरबीआय जेव्हा चलन बाजारात हस्तक्षेप करते तेव्हा विदेशी चलन मालमत्तेत मोठा बदल दिसून येतो. चलन बाजारातील हस्तक्षेपामुळं, परकीय चलन संपत्ती वाढते किंवा कमी होते. ज्यामुळं RBI च्या परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला ठेवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे.

महत्वाच्या बातम्या:

भारताचा परकीय चलनसाठा पुन्हा घटला, आता तिजोरीत शिल्लक किती? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Embed widget