एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भारताचा परकीय चलनसाठा पुन्हा घटला, आता तिजोरीत शिल्लक किती? 

देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Indias foreign exchange) पुन्हा एकदा घट झाल्याचे समोर आले आहे.  रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

Forex Reserve: देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Indias foreign exchange) पुन्हा एकदा घट झाल्याचे समोर आले आहे.  रिझर्व्ह बँकेच्या (RBI) ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार भारताचा परकीय चलन साठा आता 616.14 अब्ज डॉलरवर गेला आहे.

रिझर्व्ह बँक दर आठवड्याच्या शेवटी परकीय चलनाच्या गंगाजळीची नवीनतम आकडेवारी जाहीर करते. हा आकडा 19 जानेवारीला संपलेल्या आठवड्याचा आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात गंगाजळी 2.79 अब्ज डॉलरने घसरली होती. त्याआधी, 12 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.6 अब्ज डॉलरने वाढून 618.94 बिलियन डॉलरवर पोहोचला होता. परकीय चलन मालमत्तेत गेल्या आठवड्यात सर्वात मोठी घसरण झाली आहे. परकीय चलन संपत्ती आता 2.6 अब्ज डॉलरने कमी होऊन 545.8 अब्ज डॉलर झाली आहे. डॉलरच्या तुलनेत विविध प्रमुख विदेशी चलनांच्या किमतीतील चढउतारांमुळे परकीय चलन मालमत्तेवरही परिणाम होतो. रिझर्व्ह बँक युरो, पाउंड, येन आणि इतर प्रमुख चलनांच्या साठ्याची गणना डॉलरमध्ये करते, त्यामुळे विनिमय दरावर त्याचा थेट परिणाम होतो.

सोन्याचा साठा 34 दशलक्ष डॉलरने घसरला

परकीय चलन साठ्यात परकीय चलन संपत्तीचा वाटा सर्वात मोठा आहे. जर आपण परकीय चलनाच्या साठ्याच्या इतर घटकांवर नजर टाकली तर सोन्याचा साठा 34 दशलक्ष डॉलरने घसरला आहे. हा साठा 47.2 अब्ज डॉलर झाला आहे. त्याचप्रमाणे, विशेष रेखाचित्र अधिकार देखील गेल्या आठवड्यात 476 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 18.2 अब्ज डॉलर झाले. या कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ठेवलेल्या गंगाजळीत 18 दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे. ती 4.85 अब्ज डॉलरवर राहिली आहे.

भारताचा परकीय चलनाचा साठा एकेकाळी 650 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला होता. भारताचा परकीय चलनसाठा ऑक्टोबर 2021 मध्ये 645 अब्ज डॉलर होता. जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. विदेशी चलनांच्या विनिमय दरांव्यतिरिक्त, इतर घटक देखील परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा रुपयाचे व्यवस्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक आपल्या साठ्यातून डॉलर काढून बाजारात टाकते. रुपयाची घसरण रोखण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ, वर्षअखेरीस 37 हजार कोटींची आवक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget