प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Jalgaon News: आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत मुकेशच्या पत्नीने केली आहे.
Jalgaon Crime Update: प्रेमविवाहाच्या सूडातून झालेल्या जळगावच्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्याचा थरकाप उडाला आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या कुटुंबियांनी जावयाला एकटं गाठून कोयता, चॉपरचे वार करत संपवल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात तणावाचे वातावरण आहे. (Crime News) एवढंच नाही तर मुकेश शिरसाठला मारहाण करताना मध्ये पडलेल्या त्याच्या घरातील 7 जणांवर वार करत गंभीर जखमी करण्यात आल्यानंतर मृत तरुणाच्या चुलत्याने या बदल्याचा विडा उचलला आहे. आपण प्रेम विवाह केल्याने आपल्या परिवारातील लोकांनी आपल्या पतीची हत्या केली आहे म्हणत मुकेशच्या पत्नीने टाहो फोडला होता. प्रेमविवाहानंतर डूक धरून पाच वर्षांनी माहेरच्या लोकांनीच नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं. या हत्येने आपलं आणि आपल्या लहान मुलींचे आयुष्य अंधारात गेलं आहे. आपल्या पतीची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत मुकेशच्या पत्नीने केली आहे. पूजाच्या आर्त हंबरड्यानं जळगावसह गाढे नगरसह संपूर्ण गाव गहिवरला होता. (Maharashtra Crime News)
काय झाले होते?
पाच वर्षांपूर्वी जळगावात मुकेश शिरसाठने बनसोडे कुटुंबातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं. प्रेमविवाह केल्यामुळे तेंव्हापासून पूजाच्या माहेरील कुटुंबाचे आणि शिरसाठ कुटुंबियांचे संबंध बिनसलेले होते. या लग्नानंतर मुकेश पहिल्यापासूनच टार्गेटवर होता. रविवारी सकाळी तो दुकानात एकटा जात असताना पूजाच्या कुटुंबियांनी त्याला गाठले आणि कोयता चॉपरचे वार करत निर्घृणपणे मुकेशची हत्या केली. त्याला मारताना मध्ये पडलेल्या त्याच्या घरातील त्याचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीणीवरही वार करत जखमी केले. या प्रकरणात आता पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आता आपण पळून जाऊन लग्न केल्यामुळं मुकेशची हत्या झाली. त्याची हत्या करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मुकेशची पत्नी पूजा हिने केली आहे.
पिंप्राळा हुडको परिसरात तणावपूर्ण शांतता
जळगावातील घटनेने पिंप्राळा हुडका परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. मुकेशच्या हत्येने कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय. संतापानं त्वेषाने पेटलेल्या पूजाच्या कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे. मयत तरुणाचे काका निळकंठ शिरसाठ म्हणाले,“मुकेशचे त्यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह झाल्यामुळे सासरच्या मंडळींशी जुने वाद होते. त्यांनी हे वाद कधीही संपवले नाहीत, उलट त्याला त्रास देण्यासाठी नेहमीच संधी शोधत राहिले.
रविवार असल्याचं त्यांना माहिती होतं, त्यामुळे तो घरी असेल याची खात्री करून त्यांनी आधीच जमाव जमवला. यांच्यासोबत आपण काहीतरी करू. त्यामुळे त्यांनी असे काम केले. कोयते, रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली, विटा देखील फेकण्यात आल्या. 25 ते 30 जणांनी हल्ला केला. त्यांना वाटत असेल की, त्यांनी आमच्या पोराला मारले आहे. त्यांचे देखील आम्ही एक-दोन खल्लास करू, तरच आम्ही राहू, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: