एक्स्प्लोर

Fifa World Cup 2022: 'मॅराडोना' ब्रँड भारतात दाखल होण्यासाठी सज्ज, ही उत्पादने चाहत्यांसाठी बाजारात येणार

Diego Maradona: तब्बल 36 वर्षांनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयानंतर आता भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Diego Maradona: तब्बल 36 वर्षांनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाच्या विजयानंतर आता भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्जेंटिनाचा विश्वचषक विजय साजरा करण्यासाठी फुटबॉल दिग्गज डिएगो मॅराडोना यांच्या नावाचा ब्रँड परवाना करारांतर्गत भारतात प्रवेश करण्यास तयार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या ब्रँड अंतर्गत, बाजारात फॅशन, खेळ, जीवनशैली, ग्राहकांसह इतर काही विभागांची उत्पादने लॉन्च करण्याची शक्यता आहे.

या श्रेणींमध्ये उत्पादने विकली जातील

कंपन्यांसोबत धोरणात्मक भागीदारीद्वारे 'मॅराडोना' ब्रँडला विविध उत्पादन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या स्थितीत आणेल असं ब्रॅडफोर्ड लायसन्स इंडियाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन गोयल यांनी सांगितले. 'मॅराडोना' ब्रँडचे मालक सात्विका एसए यांनी आम्हाला त्यांचे खास भारतीय भागीदार म्हणून नियुक्त केले आहे. ब्रॅडफोर्ड लायसन्स इंडियाला गेल्या महिन्यात अधिकृतता प्रमाणपत्र जारी करण्यात आले. कंपनी फॅशन, जीवनशैली, ग्राहक उत्पादने, क्रीडा आणि इतर उद्योगांमधील 60 हून अधिक जागतिक ब्रँड्सचे व्यवस्थापन करते.

ब्रँड नावाने उत्पादने लवकरच बाजारात

कंपनी मॅराडोना मालाच्या संभाव्य भागीदारीसाठी आम्ही मोठ्या फॅशन कंपन्या आणि ई-कॉमर्स रिटेलर्सशी चर्चा करत आहोत. भागीदारी ऑफरिंग प्लॅननुसार ही उत्पादने उपलब्ध करून दिली जातील. आम्ही कोणत्याही विशिष्ट प्रदेशाकडे किंवा राज्याकडे पाहत नाही, तर तरुण आणि क्रीडाप्रेमी आमचे लक्ष्य ग्राहक असतील. मॅराडोना ग्रँडची उत्पादने बाजारात येण्यासाठी 3-4 महिने लागतील आणि भारतातील ही मोहीम दीर्घ कालावधीची असेल, असे ते म्हणाले. मात्र, याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी सात्विका एसए यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले,

मॅराडोना स्पोर्ट्स आयकॉन

भारतातील ब्रँडच्या शक्यतांबाबत अर्जेंटिनाचे फॅबियन ओलेमबर्ग यांनीही स्पष्टीकरण दिलं. मॅराडोना हे क्रीडा जगताचे आयकॉन होते. त्यांच्या नावानेच त्यांच्या चाहत्यांमध्ये अनेक आकांक्षा निर्माण होतात. त्यांच्या सर्व श्रेणींमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या शक्यता खूप जास्त आहेत. Fabian Olemberg येथे ब्रॅडफोर्ड लायसन्स इंडियासह मॅराडोना ब्रँडसाठी एजंट म्हणून अधिकृत आहे.

मॅराडोना महान फुटबॉलपटूंपैकी एक

अर्जेंटिनाला 1986 चा विश्वचषक जिंकून देण्यात मॅराडोना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते सर्व काळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानले जातात. दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना रविवारी रोमहर्षक लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव करून 36 वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता बनला आहे.
 
 
दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
युद्धज्वर शिगेला, सराफा बाजारात सोने- चांदीच्या दरवाढीला मात्र ब्रेक; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Iran America war unemployment: आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Embed widget