Apple च्या फिचरमुळे Facebook ला 10 अब्ज डॉलरचं नुकसान
Meta Platforms Inc ने अॅप्पलमुळे दहा अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचं सांगितलं. अॅप्पल कंपनीच्या एका फिचर्समुळे फेसबुकला तब्बल दहा अब्ज डॉलरचं नुकसान झालेय.
Facebook Shares Drop : स्मार्टफोन्स आणि सोशल मीडिया आज जवळपास सर्वांनाच माहिती आहे. या मार्केटबद्दल माहित नसलेला माणूस क्वचितच असेल. फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया कंपनीची मूळ कंपनी Meta Platforms Inc ने अॅप्पलमुळे दहा अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याचं सांगितलं. अॅप्पल कंपनीच्या एका फिचर्समुळे फेसबुकला तब्बल दहा अब्ज डॉलरचं नुकसान झालेय.
बुधवारी Meta Platforms Inc ने सांगितले की, अॅप्पलच्या प्रायव्हसी बदलामुळे मोठं नुकसान सहन करावे लागले. iOS च्या प्रायव्हसी बदलावामुळे फेसबूक कंपनीला दहा अब्ज डॉलर रुपयाचं नुकसान झालेय. Meta Platforms Inc चे सीएफओ डेव्ह वेहनर यांच्या मते, iOS च्या बदलामुळे यावर्षी कंपनीच्या व्यावसायावर मोठा परिणाम झालाय. मेटाचं म्हणणं आहे की, वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांची कामगिरी अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. Apple ने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमची गोपनीयता बदलली आहे. त्यामुळे ब्रँड्सना Facebook आणि Instagram वर जाहिरात करणे कठीण होत आहे. यासोबतच पुरवठा साखळीतील आव्हानांमुळे कंपनीच्या अडचणीही वाढल्या आहेत.
डेव्ह वेहनर यांच्यामध्ये कंपनीला जवळपास दहा अब्ज डॉलरपर्यंत नुकसान झालं आहे. ही माहिती जारी केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्केंपेक्षा जास्त घसरण झाली आहे. अॅप्पल कंपनीच्या अॅप ट्रॅकिंग ट्रांस्पेरेंसी फिचरमुळे हे नुकसान झाल्याचे बोललं जातेय. हे फिचर जवळपास 72 टक्के मॉडर्न iPhones मध्ये आहे. गेल्यावर्षी हे फिचर लाँच झाले होते. हे फिचर आयफोनमधील कोणत्याही अॅपवर आलेली जाहीरात स्कीप करण्यासाठी वापरले जाते.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील मार्क झुकरबर्ग यांचे स्थान खाली घसलले आहे. झुकरबर्ग यांच्या संपत्तीत जवळपास 12 टक्क्यांनी घट झाली आहे. वॉरन बफेट यांनी संपत्तीच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live