EPFO Deadline Extended: EPFO चा मोठा निर्णय! वाढीव पेन्शन योजनेची मुदत वाढवली, आता 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)अधिक पेन्शनसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 जुलैपर्यंत वाढवली आहे. अधिक निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे.
EPFO Deadline Extended: भविष्य निर्वाह निधीच्या कोट्यावधी सभासदांसाठी पुन्हा एकदा चांगली बातमी समोर आली आहे. EPFO ने अधिक पेन्शनचा (Higher Pension) पर्याय निवडण्यासाठीच्या मुदतीत वाढ केली आहे. अधिक पेन्शन मिळवण्यासाठीचा पर्याय निवडण्यासाठीची शेवटची तारीख 26 जून होती. आता, या तारखेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आता सभासदांना 11 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)अधिक पेन्शनसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 जुलैपर्यंत वाढवली आहे. अधिक निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ती 3 मे 2023 ची तारीख 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर अधिक पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठीच्या शेवटच्या तारखेचा पर्याय वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत पुन्हा एकदा अंतीम तारीख वढवण्यात आली आहे.
पात्र सदस्यांना अर्ज करता येणार
आता जास्त पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 11 जुलैपर्यंत अर्ज करावा लागेल. जरी उच्च पेन्शन योजना प्रत्येकासाठी नाही. सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPFO सदस्य होते अशा पात्र सदस्यांना अर्ज करता येणार आहे.
दोनदा केली होती मुदतवाढ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अधिक पेन्शनसाठी पात्र सभासदांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. शेवटच्या तारखेनंतर जास्त पेन्शन मिळण्यास पात्र राहणार नाही. ईपीएफओने यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा तारीख वाढवण्याची शक्यता कमी आहे. पात्र सभासदांसाठी ही शेवटची संधी आहे.
EPFO extends deadline to apply for higher pension for members till July 11
— Press Trust of India (@PTI_News) June 26, 2023
अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक
ईपीएफओने याबाबत एक ट्विटही केले आहे. दरम्यान ईपीएफओचा नवीन निर्णय अशा पेन्शनधारकांसाठी दिलासादायक आहे. ईपीएफओने मुदत वाढवल्याचे परिपत्रक जारी केले आहेत.अर्ज करण्यसाठी ऑनलाइन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
ईपीएफओकडून सर्क्युलर जारी
वास्तविक, वापरकर्ते ईपीएफओकडून अधिक पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईपीएफओने लोकांना हा पर्याय निवडण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर, उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची सुविधा 3 मे पर्यंत वाढविण्यात आली. नंतर, EPFO ने पुन्हा एकदा मुदत वाढवून 26 जून केली.
अनेकदा मुदत वाढवण्यात आली
ईपीएफओकडून अधिक पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईपीएफओने लोकांना हा पर्याय निवडण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर, उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची सुविधा 3 मे पर्यंत वाढविण्यात आली. नंतर, EPFO ने पुन्हा एकदा मुदत वाढवून 26 जून केली.
हे ही वाचा :