15000 मिळवायचे असतील तर आधी 'हे' काम करा, अन्यथा सरकारच्या ELI योजनेचा लाभ मिळणार नाही
ELI Scheme News: एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेचा लाभ घेण्यासाठी, युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.
ELI Scheme News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (EPFO) चालवली जात असलेल्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेचा लाभ घेण्यासाठी, युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं याबाबत 2 फेब्रुवारीलाच अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. तुम्ही जर हे काम केलं नसले तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा, तुम्हाला एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह या योजनेचा लाभ मिळणार नाही.
UAN म्हणजे काय?
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे कर्मचाऱ्यांना प्रदान केलेला 12-अंकी क्रमांक आहे. हे कर्मचारी आणि नियोक्ता दोघांसाठीही महत्त्वाचे आहे. कारण त्याच्या मदतीने कर्मचारी त्याच्या EPF खात्याची माहिती मिळवू शकतो आणि ते सुरक्षित ठेवू शकतो. UAN च्या मदतीने कर्मचारी त्यांची PF शिल्लक ऑनलाइन तपासू शकतात. PF ट्रान्सफर करु शकतात आणि त्यातून पैसेही काढू शकतात.
एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) स्कीम म्हणजे काय?
केंद्र सरकारने सुरू केलेल्या एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेचा उद्देश नवीन कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. या अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे एक महिन्याच्या पगाराच्या रुपात सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम कमाल 15000 रुपयांपर्यंत असू शकते आणि ती तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
ELI योजनेच्या अटी काय?
कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
कर्मचाऱ्यांचा UAN क्रमांक सक्रिय असावा.
कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असणे आवश्यक आहे.
सरकारने दिलेली ही मदतीची रक्कम थेट कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात पाठवली जाते.
तुम्ही UAN कसे सक्रिय करु शकता?
1) EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा [unifiedportal-mem.epfindia.gov.in](https://unifiedportal-mem.epfindia.gov.in).
2) महत्त्वाच्या लिंक्स विभागात जा आणि UAN सक्रिय करा वर क्लिक करा.
3) आता तुमचा UAN नंबर, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका
4) माहिती भरल्यानंतर, घोषणा बॉक्स तपासा आणि "ऑथोरायझेशन पिन मिळवा" बटणावर क्लिक करा
5) तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो एंटर करा आणि सबमिट करा.
6) UAN सक्रिय झाल्यानंतर, EPFO कडून तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड पाठवला जाईल.
7) आता UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
8) लॉग इन केल्यानंतर, तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.
महत्वाच्या बातम्या:
























