एक्स्प्लोर
US China Trade War:चीनचा अमेरिकेवर दुसरा पलटवार, 84 टक्के टॅरिफ लादल्यानंतर 18 अमेरिकन कंपन्यांवर कारवाई, यादी समोर
US China Trade War: चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेनं लादलेल्या 104 टक्के टॅरिफला प्रत्युत्तर दिलं असून 84 टक्के टॅरिफची घोषणा केलीय.
चीनचा अमेरिकेवर दुसरा पलटवार
1/5

चीननं अमेरिकेवर पलटवार करत 84 टक्के टॅरिफ लादलं आहे. अमेरिकेला सावरण्याची संधी न देता चीननं आणखी एक निर्णय घेतला आहे.
2/5

शी जिनपिंग यांच्या सरकारनं अमेरिकेच्या 18 कंपन्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये 12 कंपन्यांना निर्यात नियंत्रण यादीत टाकलंय. तर, 6 अमेरिकन कंपन्यांना अविश्वसनीय संस्था असं संबोधलं आहे.
3/5

ग्लोबल टाइम्स नुसार चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं 6 कंपन्यांवर तैवानला शस्त्र विकण्याचा त्यासह सैन्य तंत्रज्ञानाच्या सहकार्याचा आरोप केला आहे. त्यामुळं शिल्ड एआय आयएनसी, सिएर्रा नेवादा कॉर्पोरेशन, सायबरलक्स कॉर्पोरेशन, एज ऑटोनॉमी ऑपरेशन्स एलएलसी, ग्रुप डब्ल्यू , हडसन टेक्नोलॉजी कंपनी या कंपन्यांना अविश्वसनीय कंपन्यांच्या यादीत टाकण्यात आलं आहे.
4/5

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आमच्या विरोधानंतर देखील या कंपन्या तैवानला शस्त्र विक्री करत होत्या त्यामुळं चीनच्या सार्वभौमत्वाला धक्का बसत असल्याचं म्हटलं. या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले.
5/5

चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं ज्या विदेशी कंपन्या कायद्याचं पालन करतात त्यांना चिंता करण्याची गरज नाही असं म्हटलं. चीन सरकार जगभरातील कंपन्यांचं स्वागत करते, असं ते म्हणाले. चीननं अमेरिकेवर सलग दुसरा पलटवार केल्यानंतर अमेरिका काय उत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.
Published at : 09 Apr 2025 08:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























