Dhanteras Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 15 हजार कोटींच्या दागिन्यांची विक्री; मुंबईतील सराफा बाजारात 600 कोटींची उलाढाल
Dhanteras Diwali 2022 : 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान सोन्याच्या दरात 368 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
Dhanteras Gold Rate Diwali 2022 : दिवाळीतील (Diwali 2022) महत्वाच्या दिवसांपैकी एक सण म्हणजेच धनत्रयोदशी (Dhanteras 2022). या दिवशी ग्राहक सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तसेच, कार, मालमत्ता इत्यादींमध्ये प्रचंड गुंतवणूक करत आहेत. दिवाळीत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगलाच गेला कारण सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे. तसेच, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात तब्बल 15 हजार कोटींच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मुंबईतील सराफा बाजारात 600 कोटींची उलाढाल, सोन्याबरोबरच चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.
17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान सोन्याच्या दरात 368 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या व्यापार सप्ताहात सोने 50,430 वर बंद झाले. त्याच वेळी, या आठवड्यात तो 50,062 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल बोललो तर, गेल्या ट्रेडिंग आठवड्यात चांदीचे दर 55,643 रुपये प्रति किलो होते. हे दर या आठवड्यात 55,555 रुपये प्रति किलोवर आले आहेत. अशा स्थितीत चांदीच्या दरात किलोमागे 88 रुपयांची घसरण झाली आहे. आयबीजेएच्या वेबसाईटवर सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये कर आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. अशा परिस्थितीत मेकिंग चार्ज जोडल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमती शहर आणि राज्यानुसार बदलतात. आठवड्याच्या सर्व व्यापारिक दिवसांसाठी सोन्या-चांदीच्या किमतीबद्दल माहिती जाणून घ्या.
17 ऑक्टोबर-21 ऑक्टोबर 2022 पर्यंत सोन्याचे दर- (प्रति 10 ग्रॅम)
17 ऑक्टोबर - 50,430 रु.
18 ऑक्टोबर - 50,362 रु.
19ऑक्टोबर - 50,236 रू.
20 ऑक्टोबर - 50,228 रु.
21 ऑक्टोबर - 50,062 रु.
17 ऑक्टोबर - 21 ऑक्टोबर 2022 चांदीचा दर - (प्रति 1 किलो)
17 ऑक्टोबर - 55,643 रु.
18 ऑक्टोबर -56,010 रु.
19 ऑक्टोबर - 55,606 रु.
20 ऑक्टोबर - 56,267 रु.
21 ऑक्टोबर- 55,555 रु.
सोन्याने गेल्या वर्षीपासून या वर्षी धनत्रयोदशीला 6% परतावा
गेल्या वर्षीपासून या वर्षीच्या धनतेरसपर्यंत, सोन्याने गुंतवणूकदारांना सुमारे 6% परतावा दिला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास त्याच्या किंमतीत 3% पर्यंत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. डॉलरची मजबूती आणि देशात तसेच जगात सातत्याने वाढणारी महागाई हे चांदीच्या किंमतीत घसरण होण्याचे प्रमुख कारण आहे.
महत्वाच्या बातम्या :