(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhanteras Diwali 2022 : धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत
Dhanteras Diwali 2022 : या दिवशी धन आणि आरोग्य देवता धन्वंतरीची पूजा केली जाते.
Dhanteras Diwali 2022 : अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी (Dhanteras 2022) हा दिवाळीचा महत्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी धन आणि आरोग्य देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. आज लक्ष्मी गणेश विष्णु पूजन आणि शिव शंकर यांचे पूजन करतात.
समुद्र मंथन झाले तेव्हा शंकराने विष प्राशन केले तो प्रदोष काल होता. सृष्टीवर आलेल्या संकटाचा नाश भगवान शंकर यांनी केला. प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटे ते सायंकाळी 8.30 या कालावधीत पूजा करावी. लक्ष्मी पूजनापेक्षा धनत्रयोदशीच्या पूजेचे जास्त महत्व आहे.
धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन यात फरक काय?
धनत्रयोदशीनंतर दोनच दिवसांनी लक्ष्मीपूजन होणार आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस देखील महत्त्वाचा आहे कारण या दिवशी लक्ष्मीचा विवाह ठरला होता. अमावस्या असल्याने दीप लावून जीवन तेजोमय करतात धन्वंतरी आणि लक्ष्मीची पूजा करतात. आज धनत्रयोदशीचं महत्व आहे. दिवाळीच्या दिवशी शंकर आणि इतर देवतांची पूजा होत नाही, फक्त लक्ष्मीची पूजा केली जाते.
धन्वंतरीची ही पूजा आज होते काय कारण धन्वंतरीची उत्पत्ती आजच झाली आरोग्याचे मुख्य रक्षण करणारी देवता आहे.
पूजा कशी केली जाते?
भगवान धन्वंतरीची मूर्तीही ठेवतात. माता लक्ष्मीची मूर्ती ही धान्यात ठेवतात, याने शोडोपंचार पूजा केली जाते, प्रसादला विविध फळं फराळ ठेवले जातात, याला अन्नकोट म्हणतात. या दिवशी 13 प्रकारचे दिवे लावले जातात. तसेच, केरसुणी, लक्ष्मीचीही पूजा करतात. केरसुणी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तीन दिवस केरसुणीची पूजा होते. महाकाली महाकाली महासरस्वती असे तीन रूप लक्ष्मीचे आहे.
यंदा दोन दिवस धनत्रयोदशी आहे?
आज आणि उद्या दोन दिवस धनत्रयोदशी आहे. नाशिकसह देशाच्या पश्चिम भागात आज धनत्रयोदशी आहे. तर,पूर्व भारतात उद्या आहे. अक्षांश रेखांशप्रमाणे त्रयोदशी आहे. 6 वाजून 5 मिनिटांपासून 8.30 पर्यंत लाभघटिका आहे
अमावस्येला सूर्यग्रहण आहे काय परिणाम जाणवू शकतात?
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण आहे. अमावस्याच्या शेवटच्या टप्प्यात सूर्यग्रहण असल्यानं त्याचे दुष्परिणाम नाही, सोमवारी दुपारी आमावस्या लागते संध्याकाळी लक्ष्मी पूजन आहे
लक्ष्मी पूजनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रहण असते तर दुष्परिणाम जाणवलं असते. मंगळवारी सायंकाळी पावणेपाच ते सव्वा सहा ग्रहण काळ आहे त्यानंतर अमावस्या संपते. हा योग 27 वर्षांनी आला आहे.
ग्रहण काळात काय करावे?
जप जाप करावे. अध्यात्मिक साधना करावी, शुभ कार्य करावे,आनंदी राहावे, खगोल प्रेमींनी आनंद घ्यावा यात कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये.
महत्वाच्या बातम्या :
Dhantrayodashi 2022 : आज दिवाळीचा दुसरा दिवस 'धनत्रयोदशी', जाणून घ्या काय महत्त्व?