एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीत एक अट राज्यातील जिल्हा सहकारी बँकांची यंत्रणा टिकवण्यासाठी ठेवल्याचं म्हटलं.

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 12 वर्ष पंतप्रधान पदाची कारकिर्द पूर्ण केलीय. हे करत असताना 4 हजार 398 दिवस हा लाॅगेस्ट इलेक्टेड पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडला. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीसंदर्भात माहिती दिली आहे. 

कर्जमाफीत फक्त एक अट

कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्थी आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट आम्ही टाकलेली आहे ती महाराष्ट्रातील बँकिंग यंत्रणा आहे, त्यातल्या त्यात जिल्हा सहकारी बँका टिकल्या पाहिजेत, यासाठी ती अट टाकली आहे. ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे, त्यांच्याकरता आम्ही यावेळी माफी करणार आहोत. मात्र, ती एका फिक्स रकमेपर्यंत त्यांची माफी करणार आहोत, उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अन्यथा आपली बँकिंग यंत्रणा पूर्णपणे उद्धवस्त होईल. 

बाकी 40 लाख शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आम्ही कर्जमाफी संदर्भात एक उपसमिती तयार केलीली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्र्यांचा त्यात समावेश असेल. ही कर्जमाफी जशी पुढं जाईल त्यातील अडचणी समोर येतील, त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या उपसमितीची असेल. कुठल्याही निवडणुका समोर नसताना ही कर्जमाफी केलेली आहे. विरोधी पक्षांनी कोणतीही ठोस मागणी न करता केलेली कर्जमाफी आहे. शासनानं स्वत: केलेली कर्जमाफी आहे. आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही, आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल. अन्यथा 2029 ची निवडणूक असल्यानं डिसेंबर 2028 ला कर्जमाफी करता आली असती,ते आम्ही केलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.   

आज राज्यात अनेक शेतकरी असे आहेत आपला माल निर्यात करत आहेत. अनेक शेतकरी असे आहेत जे शेतीत परिवर्तन करत माॅडेल शेती तयार करत आहेत. शेतीला फायद्यात आणत आहेत. मात्र  गरीब शेतकऱ्यांना मदत करावी लागेल आणि सक्षम करावं लागेल. सरकार ते करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय वित्त विभागासंदर्भात बोलायचं तर आता तरी अर्थ विभाग माझ्याकडेच आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  

शेतकऱ्यांनी सरकारच्या सूचनांचा वापर करावा

एल निनोसंदर्भात आपण तयारी करत आहोत.  राज्यावर त्याचा परिणाम होईल आणि टास्कफोर्स आपण तयार केला आहे. जलसंधारणावर आपण भर दिला आहे. पाऊस कमी असला तरी आपण मार्ग काढूयात. राज्य सरकारच्या सल्ल्याच्या आधारे पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, ॲडव्हायजरीकडे लक्ष द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget