Devendra Fadnavis: पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
Devendra Fadnavis : पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा या दशकातील चमत्कार आहे. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे.

Devendra Fadnavis on PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 12 वर्ष पंतप्रधान पदाची कारकिर्द पूर्ण केलीय. हे करत असताना 4 हजार 398 दिवस हा लाॅगेस्ट इलेक्टेड पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडीत काढला. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. कारकिर्द लांब आहे, यासाठी महत्त्वाची नाही, तर जगाच्या पाठीवर भारताची पत वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे. एनडीए सर्वात मोठा समूह म्हणून 22 राज्यात सरकार चालवत आहे. देशाच्या 80 टक्के भूभागावर एनडीए शासित राज्य सरकार आहेत. काँग्रेसला यश मिळालं नव्हतं, त्याहून अधिक एनडीएला प्राप्त झालं आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपचे सरकार आले, त्यामुळे आम्ही अधिक आनंदीत आहोत. पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा या दशकातील चमत्कार आहे. शिवाय मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे, तर फायनेस्ट पंतप्रधान आहे. असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान मोदींचं (Prime Minister of India) भरभरून कौतुक केलं आहे.
Devendra Fadnavis : भारत 5 ट्रिलियन डॉलर्सच्या दृष्टीने पुढे जातोय, सेमिकंडक्टरमध्ये भारत वैश्विक होतोय
12 वर्षाच्या कार्यकाळात 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेत, त्यातील 22 सर्वोच्च सन्मान आहेत. देशाची डायव्हर्सिटी बघितली तर भारताच्या नेतृत्वावर विश्वास दिसतो आहे. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आपण 5 ट्रिलियन डॉलर्सच्या दृष्टीने पुढे जात आहे. 84 टक्के कर एकाच वेळी आपण भरुन काढू शकतो. आज भारताकडे एका दिवसात 84 टक्के कर्ज परत करु शकतो. युपीएकडे एक दिवसाची इम्पोर्ट क्षमता नसायची, आता ती 11 महिन्याची आहे. जीएसटीमध्ये महाराष्ट्र प्रथम आहे. डिजिटल व्यवहारात आपण सर्वांना मागे टाकले आहे. आपण सुरु केलेला युपीआय 30 देश वापरत आहेत. प्रत्यक्ष करसंग्रह 27 लाख कोटीपेक्षा अधिक गेले आहेत. सेमिकंडक्टरमध्ये भारत वैश्विक होतो आहे. अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.
Devendra Fadnavis on PM Modi : तीव्र गरीबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार आहे.
मोदीजींचे रेटिंग 75 टक्के ठेवलेले आहेत. जागतिक रेटिंग एजन्सीजकडून सर्वात महत्त्वाचे घडले असेल तर तीव्र गरीबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढलं. हा दशकातील चमत्कार आहे. 81 कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा, 11 कोटी पेक्षा जास्त किसान सन्मान योजनेतून 4 लाख कोटींहून अधिक रक्कम दिली. तर दूध उत्पादन 70 टक्के वाढले असून आज भारत सर्वाधिक उत्पादन करतो. सूक्ष्म सिंचन करण्याचा विक्रम आपल्याकडे झालाय. 32 कोटी महिलांची खाती आहेत. 5 लाखांपर्यंत उपचार मोफत मिळाला. प्राप्तीकराची लिमिट 12 लाख 75 हजारपर्यंत वाढवलीय. पंतप्रधान आवास योजनेतून 4 कोटी घरं तयार झालीत आणि आणखी 3 कोटी घरं तयार होत आहेत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis : 3 कोटी महिला लखपती दीदी झाल्यात, डिजिटल योजनांच्या माध्यमातून 58 लाख कोटी रुपये
लखपतीदीदी कार्यक्रमातर्गत 3 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आपण 50 लाख टप्पा गाठला आहे. भारताच्या सैन्यात 11 हजार महिलांची संख्या गेली, जी आधी केवळ 3 हजार होती. महिला सशक्त करणे आणि महिला केंद्रीत अर्थव्यवस्था करण्याचे प्रयत्न आपण करतो आहे. सुशासन आणि सुप्रशासन हे दोन्ही बलस्थान राहिलेत. सरकारची योजनांचे बळकटीकरण आपण केले. डिजिटल योजनांच्या माध्यमातून 58 लाख कोटी रुपये विविध योजनांतून दिले आहेत. जेम पोर्टलच्या माध्यमातून आपण भ्रष्टाचार संपवला. पायाभूत सुविधांचे क्षेत्र आहे ते वाढवले. आधी २ लाख कोटी खर्च करायचो, आता तो 12 लाख कोटी रुपये खर्च करतोय. 34 किमी रस्ते महामार्ग आपण करतोय, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी























