एका दिवसात शेअर वाढला अन् झाला चमत्कार, अॅपल, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी ठरली सर्वांत मोठी!
या कंपनीचा शेअर एका दिवसात 16 टक्क्यांनी वाढले आहे. परिणामी या कंपनीच्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाली आहे. आता हीच कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत सर्वांधिक मोठी ठरली आहे.
मुंबई : मायक्रोसॉफ्ट (Microsoft), अॅपल (Apple) या टेक क्षेत्रातील कंपन्या जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. या कंपन्यांचा जगरभरातील विस्तार आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री यामुळे त्यांचे बाजार भांडवल कित्येक कोटी रुपये आहे. मात्र या दोन्ही कंपन्यांना एका आगळ्यावेगळ्या कंपनीने मागे टाकलं आहे. या कंपनीचे बाजार भांडवल अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांपेक्षाही अधिक झाले असून ही कंपनी आता जगातील क्रमांक एकची कंपनी झाली आहे. या कंपनीचे नाव Nvidia आहे. ही कंपनी ग्राफिक्स कार्डची निर्मिती करते.
एका दिवसात बाजार भांडवल 277 अब्ज डॉलर्सने वाढले
एनव्हिडीया या कंपनीने चार महिन्यांपूर्वी असाच एक नवा विक्रम रचला होता. फेब्रुवारी महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल 16 टक्क्यांची वाढ झाली होती. शेअरर्सचे हे मूल्य वाढल्यामुळे एनव्हिडीया कंपनीचे बाजार भांडवल एका दिवसात 277 अब्ज डॉलर्सने वाढले होते. ज्यामुळे या कंपनीचे बाजार भांडवल थेट 2 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाले होते. एखाद्या कंपनीच्या बाजार भांडवलात एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होणारी ही एकमेव कंपनी आहे.
Nvidia कंपनीचे बाजार भांडवल आता किती झाले?
Nvidia कंपनीच्या शेअरचे मूल्य 136 डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये 3.5 टक्क्यांची वाढ दिसली आहे. या वाढीनंतर कंपनीचे बाजार भांडवल 3.34 ट्रिलियन डॉलर्स झाले आहे. 2024 सालाच्या सुरुवातीच्या काळासोबत याची तुलना करायची झाल्यास हे बाजार भांवडल थेट दुप्पट झाले आहे. एनव्हिडीया या कंपनीने महिन्याच्या सुरुवातीलाच बाजार भांडवलाच्या बाबतीत अॅपल कंपनीला माग टाकलं आहे. आता मायक्रोसॉफ्ट या कंपनीला मागे टाकून ही कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत सर्वांत मोठी कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे.
भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री ही कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत जगात 46 व्या स्थानी आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 236.71 अब्ज डॉलर्स आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास या कंपनीचे बाजार मूल्य 19.75 ट्रिलियन रुपये आहे. यावरून एनव्हिडीया ही कंपनी प्रथम क्रमांकाची कंपनी किती मोठी आहे, याची कल्पना येईल .
आठ वर्षांत Nvidia कंपनीचा चेहरामोहरा बदलला
Nvidia या कंपनीच्या प्रगतीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या कंपनीचा गेल्या आठ वर्षांमागाचा इतिहास समजून घ्यायला हवा. आठ वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य हे सध्याच्या किमतीच्या तुलनेत एक टक्क्यांपेक्षाही कमी होते. या कंपनीची ग्राफिक्स कार्ड तयार करणाऱ्या AMD या कंपनीशी स्पर्धा होती. जगातील सर्वोत्तम ग्राफिक्स कार्ड कोण तयार करणार? यासाठी या दोन्ही कंपन्यांत स्पर्धा होती. मात्र आता एनव्हिडीया ही कंपनी फार पुढे गेली आहे. या कंपनीची दिवसेंदिवस प्रगती झालेली आहे.
हेही वाचा :
बँक एफडीवर असतो धोका? जाणून घ्या फिक्स्ड डिपॉझिटच्या माहीत नसलेल्या 'या' गोष्टी
तुमच्या पूर्वजांनी 'ही' एक गोष्ट केली असती तर तुमचं नशीब फळफळलं असतं; एका क्षणात झाले असता लखपती!