(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crude Oil Price : ...तर कच्च्या तेलाचे दर ओलांडणार 300 डॉलर प्रति बॅरलचा दर!
Crude Oil Price : रशियावर लादण्यात येणाऱ्या निर्बंधाचा परिणाम जगावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Crude Oil Price : रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 130 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहेत. तर, दुसरीकडे रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीयन देशांनी निर्बंध लागू केले आहेत. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिका आणि युरोपकडून रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध लागू शकतात. हे निर्बंध लागू झाल्यास त्याचा फटका जगाच्या इतर देशांना बसण्याची भीती आहे. कच्च्या तेलाचे दर 300 डॉलर प्रति बॅरल इतका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिका आणि युरोपकडून रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध लागू झाल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी दिला. त्यांनी म्हटले की, रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घातल्यास मोठी अस्थिरता निर्माण होईल. इंधनाचे दर आणखी वाढतील. सामान्य ग्राहकांचे नुकसान होणार आहे. युरोपीयन देशांना मोठा फटका बसू शकतो असेही त्यांनी म्हटले. जागतिक बाजारपेठेत इराणी कच्च्या तेलाच्या (Iranian Crude Oil) संभाव्य पुरवठ्यात विलंब झाल्यामुळं तेलाच्या किमती 2008 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. अमेरिका आणि युरोपियन युनियन रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा विचार करत आहेत.
कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक आहे रशिया
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. क्रूड ऑइल उत्पादक देशांमध्ये रशिया हा प्रमुख देश आहे. युरोपला मागणीच्या एकूण 35 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा रशियाकडून होतो. भारतदेखील रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. कच्च्या तेलाचा पुरवठा खंडीत झाल्यास आगामी काही दिवसात दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- जागतिक शेअर बाजाराच्या इतिहासात केव्हा केव्हा झाली होती सगळ्यात मोठी घसरण
- GST: महागाईच्या झळा वाढणार! जीएसटी कर वाढण्याचे संकेत, असे असतील नवे दर?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha