एक्स्प्लोर

जागतिक शेअर बाजाराच्या इतिहासात केव्हा केव्हा झाली होती सगळ्यात मोठी घसरण  

Share Market Down : सध्या 2022 वर्ष चालू आहे आणि शेअर बाजारात सातत्याने मोठी घसरण होते आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही जगभरातील शेअर बाजारांमध्ये अशीच किंवा त्याहून मोठी घसरण झाली आहे.

Share Market Down : सध्या 2022 वर्ष चालू आहे आणि शेअर बाजारात सातत्याने मोठी घसरण होते आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही जगभरातील शेअर बाजारांमध्ये अशीच किंवा त्याहून मोठी घसरण झाली आहे. इतिहासातील सर्वात वाईट स्टॉक मार्केट क्रॅश आणि त्यांची कारणे जाणून घेऊया.

भारतीय इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी 50 यांना सोमवारी गॅप-डाउन ओपनिंगनंतर मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण ठरताना दिसलं.सोबतच रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $१३० च्या वर गेला आहे. अनेक नवीन गुंतवणूकदारांनी अशी घसरण पाहिली नव्हती. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि आपत्तीजनक फॉल्सबद्दलची माहिती देत आहोत.

1907 ची दहशत - 
याला बँकर्स पॅनिक ऑफ 1907 म्हणून ओळखले जाते. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर बाजार कोसळण्याचे पहिले मोठे आणि प्रसिद्ध उदाहरण आहे. नाइकरबॉकर ट्रस्ट कंपनीने कॉपरच्या शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार केल्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) वरील शेअरच्या किमती जवळपास 50 टक्क्यांनी घसरल्या. आर्थिक मंदीच्या काळात ही घटना घडल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरलं होतं

1929 मध्ये वॉल स्ट्रीट क्रॅश - 
10 वर्षांच्या सतत बाजारपेठेतील समृद्धीनंतर, 1930 च्या दशकाची सुरुवात भीतीदायक होती. 10 वर्षांची आर्थिक वाढ रोअरिंग ट्वेन्टीज म्हणून ओळखली जाते. जसजशी यूएस अर्थव्यवस्था शिखरावर पोहोचत होती, तसतशी तिचा वेग हळूहळू बदलला आणि आकुंचन सुरू झाले. यामुळे एकामागून एक अशा घटना घडत गेल्या, त्यामुळे 25 ऑक्टोबर 1929 रोजी डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी 12 टक्क्यांहून अधिक घसरली. त्याला "ब्लॅक फ्रायडे" म्हटले गेले. सुमारे एक दशकापर्यंत, भांडवलशाही आर्थिक व्यवस्थेच्या मोठ्या भागांमध्ये पसरलेल्या भीतीमुळे राजकीय बदल होऊन दुसरे महायुद्ध सुरू झालं होतं.

1987 चा काळा सोमवार - 
19 ऑक्टोबर 1987 रोजी आणखी एक गंभीर घसरण झाली, जेव्हा डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी 22 टक्क्यांहून अधिक घसरली. 508 अंकांची ही घसरण टक्केवारीच्या दृष्टीने एका दिवसातील सर्वात मोठी घसरण म्हणून नोंदवली गेली. तो कार्यक्रम काळा सोमवार अर्थात ब्लॅक मंडे म्हणून ओळखला जाऊ लागला. मार्केटमध्ये भीती होती आणि अशीच घसरण पुन्हा होऊ शकते असे समजले जात असले तरी दुसऱ्या दिवशी अमेरिकन बाजारात बरीच सुधारणा झाली होती.

2007 चे जागतिक आर्थिक संकट - 
बाजारातील सहस्राब्दीतील सर्वात मोठी घसरण ऑक्टोबर 2007 मध्ये दिसून आली. अमेरिकेत अनेक वित्तीय संस्थांचे अपयश समोर आले आणि त्यानंतर बाजारात भूकंप झाला. हा भूकंप युरोप आणि जगाच्या इतर भागांमध्ये पसरायला वेळ लागला नाही, ज्यामुळे शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली. 2009 च्या मध्यापर्यंत बाजाराची घसरण सुरूच राहिली, जेव्हा यूएस निर्देशांक 50 टक्क्यांहून अधिक घसरले.

2020 मध्ये कोरोना व्हायरस संकट - 
फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये, जगभरातील शेअर बाजारांमध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या भीतीने लक्षणीय घसरण झाली. मार्च 2020 च्या सुरुवातीला, जागतिक बाजारपेठांमध्ये तणाव होता, कारण कोरोना अनेक देशांमध्ये पसरत होता परिणामी जगामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आणि मार्केटमध्ये भयावह घसरण झाली.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Embed widget