(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पांढऱ्या 'सोन्याला झळाळी', बळीराजाला दिलासा; कोणत्या बाजार समितीत किती दर?
Cotton Price : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Cotton Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कापसाच्या दरात (cotton price) सुधारणा झाली आहे.
Cotton Price : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Cotton Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कापसाच्या दरात (cotton price) सुधारणा झाली आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा होत आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्तीचा दर मिळत आहे. असे असले तर शेतकऱ्यांना आणखी भाववाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.
दरम्यान, यावेळी बदलत्या हवामानाचा कापसाला मोठा फटका बसलाय. त्यामुळं कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळं उत्पादन कमी झाल्यानं मागणी वाढणार आहे, त्यामुळं कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. सध्या महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात चांगली वाढ झाली आहे. कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. या दरामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल आहे.
गुलाबी बोंडअळीचा कापूस पिकाला मोठा फटका
राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली होती. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होती. पण गुलाबी बोंडअळीचा कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. तर अनेक ठिकाणी पिकासाठी योग्य वातावरण राहिलं नाही, त्यामुळं उत्पादनावर परिणाम झालाय. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार 2023-24 मध्ये कापसाची उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्पादनात घट झाल्याची परिणाम दरांवर होत आहे, परिणाम शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
कोणत्या बाजार समितीत कापसाला किती दर?
अकोला बाजार समितीत चांगल्या कापसाला सरासरी 8094 रुपये प्रतिक्विंट असा भाव मिळाला आहे. तर चिमूर मंडईत कापसाला सरासरी 7651 रुपयांचा दर मिळाला आहे. अमरावती बाजार समितीत 7275 रुपयांचा दर मिळाला आहे. मानवत बाजार समितीत कापसाला सरासरी 7900 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. उमरेड बाजार समितीत कापसाला 7450 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसाचा कापूस पिकाला मोठा फटका बसला होता. राज्यातील बहुतांश भागात अवकळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं अनेक ठिकाणी कापसाच्या वाती झाल्याचं पाहायला मिळालं होतं. कापसासह रब्बी हंगामातील काढणीला आलेला हरभरा, गहू, सोयाबीन, मुंग इत्यादी पिकांची नासाडी झाली होती. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. धीच शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने डबघाईला निघालेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. अशात कापसाच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Vidharbha Unseasonal Rain Update : विदर्भात अवकाळी पाऊस, गारपिटीचा कहर; कापसाच्या वाती झाल्या, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान