एक्स्प्लोर

Coronavirus : अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा, शेअर बाजारात सावध प्रतिक्रिया

कोरोना संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर शेअर बाजारात सावध प्रतिक्रिया पाहायला मिळाली.

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (17 एप्रिल) मीडियाशी संवाद साधला. कोरोना संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर शेअर बाजारात सावध प्रतिक्रिया पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली नसली तरी सुरुवातीच्या सत्रात 1000 अंकांच्या पार पोहोचलेला सेन्सेक्स शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेनंतर 700 अंकांपर्यंत खाली आला. आरबीआय गव्हर्नर आपल्या पत्रकार परिषदेत काही मोठ्या घोषणा करतील, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा होती. परंतु त्यांच्या पदरी फारसं काही पडलं नाही. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसला.

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची मजबुती पाहायला मिळाली होती, त्यामुळे सेन्सेक्स 31 हजार 500 अंकांच्या पार पोहोचला होता. तर सुमारे 250 अंकांसह निफ्टी 9,300 अंकांपर्यंत पोहोचला होता. मात्र आरबीआयच्या पत्रकार परिषदेनंतर शेअर बाजारात सेन्सेक्स 700 अंक तर  निफ्टी 200 अंकांवर आला.

शक्तिकांत दास यांची दुसरी पत्रकार परिषद लॉकडाऊनमधील शक्तिकांत दास यांची ही दुसरी पत्रकार परिषद आहे. याआधी शक्तिकांत दास यांनी 27 मार्च रोजी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांच्या कपातीची घोषणा केली होती होती.

RBI कडून मोठा दिलासा, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपातीसह अनेक महत्वाच्या घोषणा

आरबीआय गव्हर्नर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

- नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला 50 हजार कोटींचे पॅकेज - रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंटने कमी, रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के - 1.9 टक्के विकास दर राहण्याची शक्यता - कोरोनामुळे निर्यात घटली, वीजेची मागणीही कमी झाली - ऑटोमोबाईल क्षेत्रातील विक्रीत मोठी घट - जी 20 देशांमध्ये सर्वात मजबूत अर्थव्यवस्था भारताची - अन्य देशांच्या तुलनेत भारताची चांगली स्थिती - देशात इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम - अडचणींमध्येही एटीएमद्वारे चांगले काम - बाजारात चलनाची कमतरता भासू न देण्यावर भर - आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणणार

या आठवड्यात शेअर बाजार कसा होता? या आठवड्यात शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. गुरुवारी (16 एप्रिल) सेन्सेक्स 222.80 अंक म्हणजेच 0.73 टक्क्यांच्या वाढीसह 30,602.61 अंकांवर पोहोचला होता. तर राष्ट्रीय निर्देशांक अर्थात निफ्टी 67.50 अंक म्हणजेच 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 8,992.80 अंकांवर बंद झाला.

- बुधवारी (15 एप्रिल) सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 1,346 अंकांच्या कक्षेत चढ-उतार पाहायला मिळाले. पण कारभाराच्या अखेरच्या सत्रात 310 अंक किंवा 1.01 टक्क्यांच्या घसरणीसह 30,379 अंकांवर बंद झाला. अशाचप्रकारे निफ्टी 68.55 अंक किंवा 0.76 टक्के घसरणीसह 8,925.30 अंकांवर बंद झाला.

-तर मंगळवारी म्हणजेच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे आर्थिक व्यवहार बंद होते. यामुळे शेअर बाजारातील व्यवहारही बंद होते.

- आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी सोमवारी सेन्सेक्स 469.60 अंकांच्या घसरणीसह 30,690.02 अंकांवर बंद झाला. याचप्रकारे निफ्टी 118.05 अंकांनी कोसळून 8,993.85 अंकांवर बंद झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget