एक्स्प्लोर

RBI कडून मोठा दिलासा, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपातीसह अनेक महत्त्वाच्या घोषणा

देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. संपूर्ण विश्वात अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. अशातच रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

मुंबई :  आरबीआयकडून रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असून 25 बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता हा रिव्हर्स रेपो रेट 4 वरून 3.75  टक्क्यांवर आला आहे. यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळले आहेत. संपूर्ण विश्वात अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. मंदीच्या संकटाशी लढण्याचा आरबीआयचा प्रयत्न सुरु आहे, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. सध्या मानवतेसमोर कोरोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असं दास यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

यावेळी शक्तिकांत दास म्हणाले, जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी 1.9 टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर 7.2 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो.

 आरबीआयकडून या महत्वाच्या घोषणा

यावेळी शक्तिकांत दास यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाबार्डला आरबीआयने 25 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. कोरोना व्हायरसचा छोट्या आणि मध्यम उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे. रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के असेल.

अशी असेल मदत

मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी एकूण 50 हजार कोटींची मदत घोषित केली आहे. यातील 15 हजार कोटी रुपये भारतीय लघू उद्योग विकास बॅंकेला देण्यात येत आहेत. कर्जाच्या पुर्नगठनासाठी हे पैसे देण्यात येत आहेत. 10 हजार कोटी एनएचबी आणि 25 हजार कोटी रुपये नाबार्डला देण्यात येणार आहेत.

ते यावेळी म्हणाले की, कोरोनाचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणत आहे. कोरोनामुळे निर्यात घटली आहे. तसेच वीजेची मागणीही कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्री घटली आहे. बाजारात चलनाची कमतरता भासू न देणे. बाजारांचे कामकाज प्रभावित न होऊ देणे हे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे. आपला डेटा सांगतोय की, इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम होत आहे. अडचणींमध्येही एटीएमद्वारे चांगले काम होत आहे. जागतिक मंदीच्या संकटात भारताचा विकास दर सकारात्मक राहणार असून 1.9 टक्के राहिल असा अंदाज आहे, असे दास यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Shirsath On Nashik Loksabha : नाशिकच्या जागेचा तिढा नव्हताच, संजय शिरसाटांची प्रतिक्रियाChandrahar Patil Jai Veeru Lok Sabha : प्रकाश आंबेडकर सांगलीत चंद्रहार पाटलांसाठी सभा घेणार?Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP MajhaNagpur Voting Update : मतदान करण्यासाठी अडथळा, अनेक जणांची नावं मतदार यादीतून वगळली ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
Do Aur Do Pyaar Review:  वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
Embed widget