Coronavirus | कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी RBI कर्मचाऱ्यांचा पुढाकार; 7.30 कोटी पीएम केअर फंडसाठी देणार
कोरोना बाधितांच्या मदतीसाठी आता देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. एकूण 7.30 कोटी रूपयांची रक्कम सर्व कर्मचारी पीएम केअर फंड्ससाठी देणार आहेत.
मुंबई : रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून काही भाग पीएम केअर्स फंडला देण्याचा निर्णय घेणार आहे. आरबीआयने सांगितल्यानुसार, ही एकूण रक्कम 7.30 कोटी रूपये एवढी असणार आहे. आरबीआयने यासंदर्भात बोलताना सांगितले की, 'कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात गरजुंना मदत करण्यासाठी शासनाने पीएम केअर फंड तयार केलं आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील लोकांकडून मदत करण्यात येत आहे.
देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने सांगितल्याप्रमाणे, बँकेतील कर्मचाऱ्यांनीही कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचारी एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचं आपलं वेतन पीएम केअर फंड्ससाठी देणार आहे. कर्मचाऱ्यांकडून एकूण 7.30 कोटी रूपये पीएम केअर फंड्ससाठी देण्यात येतील.
पाहा व्हिडीओ : आरबीआयकडून म्युच्युअल फंडसाठी 50 हजार कोटींची तरतूद
दरम्यान, आरबीआयच्या आधी अनेक संस्था आणि सेलिब्रिटींनी पीएम केअर फंड्समध्ये मोठी रक्कम देण्याची घोषणा केली आहे. सेलिब्रिटींव्यतिरिक्त इंडस्ट्रिअल ग्रुप्स आणि अनेक उद्योजकांनीही मदतीचा हात देऊ केला आहे.
रिलायंस इंडस्ट्रीजने पीएम केअर फंड्समध्ये 500 कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. याव्यतिरिक्त टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनीही पीएम केअर फंड्ससाठी तब्बल 15 हजार कोटींची मदत केली आहे.
सिनेसृष्टी आणि टिव्ही जगतातील अनेक नामांकित व्यक्तींनी पीएम केअर फंड्ससाठी मदत केली आहे. तर सामान्य नागरिकही यासाठी मदत करत आहे. अनेक लोक पेटीएम, बँक खाती, युपीआय, भिम अॅप किंवा एनइएफचीमार्फत पीएम केअर फंड्समध्ये आपल्या परिने मदत करत आहेत. कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यासाठी दिग्गजांसह अगदी सामान्य नागरिकांनीही मदतीचा हात देऊ केला आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्र सरकार किंवा महापालिकांचा निर्णय आल्याशिवाय दुकानं उघडू नका : वीरेन शाह
Jio-Facebook करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
YES BANK | घाबरण्याचं कारण नाही, तुमचे पैसे सुरक्षित; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं आश्वासन