Share Market : शेअर बाजारात मोठी अस्थिरता, Sensex मध्ये 36 अंकांची वाढ
Stock Market Updates : कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली तर मेटलमध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं.
मुंबई : शेअर बाजारात (Stock Market Updates) आज मोठी अस्थिरता दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 36 अंकांची वाढ झाली तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 3.30 टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,803 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.02 टक्क्यांची घट होऊन तो 17,539 अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारात आज 1726 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1612 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 137 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
शेअर बाजारात (Stock Market Updates) आज BPCL, Shree Cements, Hero MotoCorp, Hindalco Industries, ONGC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. तर HDFC, ITC, Adani Ports, Larsen and Toubro आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
आज कॅपिटल गुड्सच्या इंडेक्समध्ये एका टक्क्याची वाढ झाली तर ऑईल अॅन्ड गॅसच्या इंडेक्समध्ये एका टक्क्याची घट झाली. आयटी, मेटल, ऑईल ऑईल अॅन्ड गॅस, फार्मा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही काहीशी घट झाली.
आज आयटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.75 टक्क्यांची वाढ झाली. तर अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 1.69 टक्क्यांची वाढ झाली. तर बीपीसीएल आणि श्री केमिकल्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 2.84 आणि 2.31 टक्क्यांची घसरण झाली.
रुपयामध्ये 25 पैशांची घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 25 पैशांची घसरण झाली असून रुपयाची किंमत आज 79.55 इतकी झाली आहे.
शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 187 अंकांच्या तेजीसह 58594 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 58 अंकांनी वधारत 17601 अंकांवर खुला झाला.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- ITC- 1.75 टक्के
- Adani Ports- 1.69 टक्के
- HDFC- 1.67 टक्के
- Larsen- 1.44 टक्के
- HDFC Bank- 0.91 टक्के
या कंपन्याच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- BPCL- 2.84 टक्के
- Shree Cements- 2.31 टक्के
- Hero Motocorp- 1.79 टक्के
- Hindalco- 1.67 टक्के
- ONGC- 1.45 टक्के