Share Market : Sensex 85 अंकानी तर Nifty 52 अंकानी वधारला, जाणून घ्या आज कोणत्या शेअर्सना फायदा झाला...
Share Market : फार्मा आणि बँक सेक्टर्स सोडून इतर सेक्टर्सच्या शेअर्सच्या किंमतीत काहीशी वाढ नोंदवण्यात आली आहे.
मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काहीशी सकारात्मकता दिसून आली. शेअर बाजार बंद होताना ऑटो, रिअॅलिटी आणि उर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलंय. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 85.88 अंकांची वाढ झाली तर निफ्टीमध्ये 52.30 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.14 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,308.91 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.29 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,308.10 वर पोहोचला आहे. आज 2101 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1295 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 113 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, उर्जा आणि रिअॅलिटी सेक्टर्सच्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तर फार्मा आणि बँक सेक्टर्सच्या शेअर्समध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलंय.
सोमवारी शेअर बाजारात Hero MotoCorp, Grasim Industries, ONGC, Tata Motors आणि UltraTech Cement या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून HCL Technologies, HDFC Bank, Britannia Industries, Axis Bank आणि Cipla या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Hero Motocorp- 5.13 टक्के
- Grasim- 3.31 टक्के
- ONGC- 2.98 टक्के
- Tata Motors- 2.96 टक्के
- JSW Steel- 2.74 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Asian Paints- 5.87 टक्के
- Axis Bank- 1.53 टक्के
- HUL- 1.26 टक्के
- UPL- 1.25 टक्के
- ONGC- 1.23 टक्के
महत्वाच्या बातम्या :