एक्स्प्लोर

Gold Rates & Silver Rates Today : मोठी बातमी: गुढीपाढव्याला सोने, चांदीच्या दरात घसरण; मुंबई, पुण्यात आजचा भाव किती?

Gold Rates & Silver Rates Today : अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजादरांबाबतचा निर्णय आणि मध्यपूर्वेतील (मिडल ईस्ट) वाढता तणाव यांदरम्यान गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण नोंदवण्यात आली.

मुंबई : आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच गुरुवारी, एकीकडे इराणशी संबंधित युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि सेन्सेक्स सुमारे १८०० अंकांनी कोसळला. मात्र, दुसरीकडे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजादरांबाबतचा निर्णय आणि मध्यपूर्वेतील (मिडल ईस्ट) वाढता तणाव यांदरम्यान गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण नोंदवण्यात आली.(Gold Rates & Silver Rates Today)

गुढीपाढव्यानिमित्त सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 
सोन्याच्या दरात प्रति तोळा ४ हजार रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो १४ हजारांची घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याचे दर आज १ लाख ५६ हजार १८६ रुपये प्रति तोळा आहेत. काल सोन्याचा दर मुंबईत प्रति १० ग्राम १ लाख ६० हजार १९० रुपये होता.अशात, आज सोन्याचा दरात ४ हजार रुपयांनी घसरला आहे. तिकडे, चांदीच्या दरात प्रति किलो जवळपास १४ हजारांची घसरण दिसते आहे. चांदीचा आज मुंबईत २ लाख ४३ हजार ९१३ रुपये प्रति किलोचा दर आहे. काल चांदीचा दर मुंबईत २ लाख ५७ हजार ६६७ रुपये प्रति किलो होता. अशात, आज चांदीच्या दरात १३ हजार ७५४ रुपयांची घसरण पाहायला मिळते आहे.(Gold Rates & Silver Rates Today)

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 'यूएस स्पॉट गोल्ड' १.२२ टक्क्यांनी घसरून ४८३६ डॉलर प्रति औंसवर आले आहे, तर 'स्पॉट सिल्वर' २.२५ टक्क्यांनी घसरून ७५.७५ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. त्याच वेळी, देशांतर्गत वायदा बाजार (MCX) वर सोन्याचा दर सुमारे १.५५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर घसरून सुमारे २.५० लाख रुपये प्रति किलो वर आला आहे.

'लेमन मार्केट डेस्क'चे रिसर्च अनालिस्ट गौरव गर्ग यांच्या मते, सोने आणि चांदीमधील या ताज्या चढ-उताराचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी स्वीकारलेली खबरदारीची भूमिका आहे.

मध्यपूर्वेतील सुरू असलेला तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे महागाईबाबतची चिंता वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सावध पावले उचलत आहेत. विशेष म्हणजे, पश्चिम आशियातील तणावाला आता सुमारे तीन आठवडे पूर्ण झाले असून सध्या शांततेची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे, अपेक्षेप्रमाणे फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही, जरी यापूर्वी सलग तीन वेळा ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली होती.

कसे ठरतात सोने आणि चांदीचे दर?

सोने आणि चांदीचे दर दररोज ठरवले जातात आणि त्यामागे अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत असतात:

आंतरराष्ट्रीय बाजार आणि डॉलर: आंतरराष्ट्रीय बाजारात या धातूंच्या किमती अमेरिकन डॉलरमध्ये ठरवल्या जातात. त्यामुळे डॉलर-रुपया विनिमय दरातील (Exchange Rate) बदलाचा थेट परिणाम यांच्या किमतीवर होतो. जर डॉलर मजबूत झाला किंवा रुपया कमकुवत झाला, तर भारतात सोने-चांदी महाग होते.

कर आणि आयात शुल्क: भारत आपल्या गरजेचा बहुतांश भाग आयात करतो, त्यामुळे सीमा शुल्क (इंपोर्ट ड्युटी), जीएसटी आणि इतर स्थानिक कर देखील किमतींवर परिणाम करतात.

जागतिक अनिश्चितता: युद्ध, आर्थिक मंदी किंवा व्याजदरातील बदल यांचा सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम होतो. जेव्हा जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर्सऐवजी सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाला पसंती देतात.

सांस्कृतिक महत्त्व: भारतात सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून ते परंपरांशी जोडलेले आहे. लग्नकार्य, सण आणि इतर शुभ मुहूर्तांवर सोने खरेदी केल्याने मागणी वाढते, ज्याचा परिणाम किमतींवर होतो.

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget