एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात भूकंप, चांदीचा दर 13000 रुपयांनी घसरला, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर 

Gold Rate 19 March 2026 : सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी मोठी घसरण दिसून आली. चांदीच्या दरात 13000 रुपयांची घसरण झाली आहे. 

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 151637 रुपये इतका आहे. आजच्या दिवशी सोन्याच्या दरात 3242 रुपयांची घसरण झाली आहे. काल सोन्याचा दर 154879 रुपये प्रति तोळा होता. 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचा पाहायला मिळालं. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 3229 रुपयांची घसरण झाली असून याचा दर 154259 रुपयांवरुन 151030 रुपयांवर आला आहे. 

18 कॅरेट सोन्याच्या दराचा विचार केला असता याच्या दरात देखील घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात आज 2970 रुपयांची घसरण झाली असून दर 141869 रुपयांवरुन 138899 रुपयांवर आला आहे. बुलियन्स को इनच्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या दरात  4350 रुपयांची घसरण झाली आहे. 

Silver Rate : चांदीच्या दरात घसरण

आयबीजेएच्या माहितीनुसार एक किलो चांदीचा दर 249907 रुपयांवरुन 13098 रुपयांच्या घसरणीसह 236809 रुपयांवर आला आहे. बुलियन्स को इनच्या माहितीनुसार चांदीचा एका किलोचा दर 235050 रुपये आहे. या वेबसाईटच्या माहितीनुसार चांदीच्या दरात 13120 रुपयांची घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीचं मुख्य कारण अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या पतधोरणाची घोषणा आणि जागतिक गुंतवणूकदारांची सतर्कता हे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या दरात 1.22 टक्क्यांची घसरण होऊन  दर 4836 डॉलर प्रति औंसवर दर आले आहेत. चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून दर 75.75 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा एका तोळ्याचा दर 155000 रुपयांच्या दरम्यान आहे. तर, चांदीचा एका किलोचा दर 250000 रुपये किलोवर पोहोचला आहे. 

अमेरिकन फेड रिझर्व्हनं सलग दुसऱ्यांदा व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. 18 मार्चला झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात  आला. अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम देखील सोने आणि चांदीच्या दरावर दिसून येत आहे. अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं शेअर बाजारावर देखील परिणाम झाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात देखील घसरण होत आहे. दुसरीकडे क्रूड ऑईलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळतं. 

भारतीय शेअर बाजारात युद्धाचा मोठा परिणाम दिसून आला. आज सेन्सेक्स तब्बल 2496.89  अंकांनी घसरुन 74207.24 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 मध्ये देखील 775.65 अंकांनी घसरण होऊन निर्देशांक 23002.15 अंकांवर बंद झाला.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह! नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Embed widget