नेमकी काय आहे 'अटल पेन्शन योजना'? कसा घ्याल 'या' योजनेचा लाभ?
भारत सरकारनं (Central Govt) देशातील नागरिकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना.
Atal Pension yojana : भारत सरकारनं (Central Govt) देशातील नागरिकांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना नागरिकांना आर्थिक लाभ देण्यासाठी चालवल्या गेल्या आहेत. यापैकी एक योजना भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरु केलेली अटल पेन्शन योजना. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी 2015 साली ही योजना सुरु केली केली. या योजना नेमकी काय? या योजनेचा तुम्ही कसा लाभ घेऊ शकता. या बाबतची माहिती पाहुयात.
या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो
देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवते. हे लक्षात घेऊन सरकारमध्ये अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत, फक्त 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक खाते उघडू शकतात. भारतातील कोणताही नागरिक जो आयकरदाता आहे किंवा आहे तो 1 ऑक्टोबर 2022 पासून या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही.
तुम्ही या योजनेचा लाभ कसा घ्याल?
अटल पेन्शन योजनेसाठी खाते कोणत्याही बँकेच्या शाखेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून किंवा बँकेच्या डिजिटल सेवेद्वारे उघडता येते. भारत सरकारच्या या योजनेत तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एक महिना, तीन महिने किंवा सहा महिन्यांसाठी ऑटो डेबिट सुविधेद्वारे प्रीमियम जमा करू शकता. या योजनेंतर्गत, तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर 1000 ते 5000 रुपये आजीवन किमान हमी पेन्शन मिळेल. खातेदार पेन्शनची रक्कम कधीही अपग्रेड किंवा डाउनग्रेड करू शकतात. तसेच, तुम्ही प्रीमियम पेमेंटची वेळ मासिक, त्रैमासिक किंवा सहामाहीमध्ये बदलू शकता.
महत्त्वाच्या बातम्या: