(Source: Poll of Polls)
बुलेट तयार करणारी कंपनी सुस्साट! 1 रुपयाचा शेअर थेट 4600 रुपयांवर, चार वर्षांपूर्वी गुंतवणूक करणारे आज मालामाल!
बुलेट बाईकची निर्मिती करणाऱ्या आयशर मोटर्स या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचे मूल्य कधीकाळी एक रुपया होते, आता हाच शेअर 4700 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मुंबई : बुलेट (Bullet Bike) या दुचाकीची क्रेझ काही वेगळीच आहे. प्रत्येक तरुणाला आपल्याकडे बुलेट असावी, असं वाटतं. मात्र प्रत्यक्ष बुलेट घेऊन फिरण्यापेक्षा ही बुलेट तयार करणाऱ्या कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. कारण बुलेट तयार करणाऱ्या आयशर मोटर्स (Eicher Motors) या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक खुशखबर दिली आहे. ही कंपी गुंतवणूकदारंना एका शेअरवर 51 रुपयांचा लाभांश (डिव्हिडेंड) देथ आहे. या कंपनीने नुकतेच चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर या कंपनीने लाभांशाची घोषणा केलेली आहे.
नफा 18 टक्के, महसुलात 12 टक्क्यांनी वाढ
Eicher Motors या कंपनीने आपल्या चौथ्यात तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. या कंपनीला साधारण 18 टक्के कन्सॉलिडेटेड नफा मिळालेला आहे. हा नफा 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीपर्यंत 1070 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत आयशर मोटर्सने 906 कोटींचा नफा नोंदवला होता. कन्सॉलिडेटेड नफ्यासह या कंपनीच्या महसुलातही 12 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. वित्त वर्ष 2024 च्या जानेारी-मार्च या तिमाहीत हा महसूल 4,256 कोटी रुपये झालाआहे. वित्त वर्ष 2022-23 साली याच तिमाहीत हा महसूल 3,804 कोटी रुपये होता.
रॉटल इनफील्डची जबरदस्त विक्री
बुलेट बाईकची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे आयशर मोटर्स या कंपनीला मोठा नफा झाला आहे. रॉयल इनफील्ड (Royal Enfield) या बाईकचा विक्रीमध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वित्तीय वर्षात वर्ष 2023 मध्ये एकूण 8,34,895 बुलेट गाड्या विकल्या होता्या. मार्च तिमाहीत हा आकड 9,12,732 पर्यंत पोहोचला आहे. बुलेटच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे कंपनीनेही ग्राहकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीकडून एका शेअरमागे 51 रुपये लाभांश देण्यात येतोय.
शेअरचे मूल्य होते एक रुपया
आयशर मोटर्स या कंपनीने सतत प्रगती केलेली आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 4670 रुपये होते. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे. 1 जानेवारी 1999 या कंपनीच्या शेअरचे मूल्य फक्त एक रुपया होते. आता हाच शेअर थेट 4669 रुपयांपर्यंत पोहोचला होता. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 13 मे रोजी या शेअरचे मूल्य 4644 पर्यंत पोहोचले आहे. या कंपनीचे बाजार भांडवल थेट 1.28 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या कंपनीच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकली तर काही गोष्टी स्पष्ट होतात. या कंपनीने गेल्या एका वर्षात 30 टक्के, पाच वर्षांत 123 टक्के रिटर्न्स दिले आहेत. याच कारणामुळे मल्टिबॅगर म्हणून समोर आलेला आहे. एप्रिल 2020 मध्ये या शेअरचे मूल्य 1268 रुपये होते. आता हा शेअर लवकरच 4700 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
करोडपती व्हायचंय? मग एसआयपीमध्ये किती गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर!
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना फटका, अर्ध्या तासात बुडाले तब्बल 4.36 लाख कोटी!
ड्रीम कार घ्यायचीय पण पैसे नाहीत? चिंता सोडा 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून घरी आणा आवडती कार!