Youths Job Education Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी काय-काय मिळालं? वाचा बजेटमधील 10 मोठे मुद्दे
Youths Job Education Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात युवक, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Youths Job Education Budget 2025 : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला मतदारांनी पुन्हा एकदा दिल्याने मोदी सरकार पुन्हा एकदा स्थापन झाले. मोदी सरकारच्या तिसर्या काळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज शनिवारी (दि. 01) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सादर करतील. या अर्थसंकल्पात युवक, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना अर्थसंकल्पाची प्रत देऊन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्याची निर्मला सीतारामन यांनी परवानगी घेतली. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या. यांनतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्रिमंडळानं अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.
युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी काय?
- 5.7 कोटी लघुउद्योग देशात येणार, लघुउद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध होणार, त्यातून 36 टक्के उत्पादन केलं जातंय. आपल्या निर्यातीपैकी 45 टक्के निर्यात सूक्ष्म व लघू उद्योगातून केली जाते. सूक्ष्म व लघू उद्योगांचं वर्गीकरण होणार, सूक्ष्म व लघू उद्योगांना रोजगार निर्मितीसाठी मदत केली जाणार.
- एमएसएमईला सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देणार, एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचे टर्म कर्ज
- स्टार्टअपची 10 कोटींवरून 20 कोटींची क्रेडिट लिमिट
- छोट्या उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड, पाक लाखांची मर्यादा
- भारतीय भाषा पुस्तक योजना – यातून शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेणं सोपं जाईल.
- उत्पादन क्षेत्रात काम करता यावे यासाठी युवकांचा कौशल्य विकास, कौशल्य प्रशिक्षणासाठी 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची उभारणी करणार
- आयटीची क्षमता वाढवली, ६५०० जागा वाढवल्या
- एआयच्या अभ्यासासाठी तीन केंद्र उभारणार, कृषी आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर
- वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात 10 हजार जागा वाढवणार, पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागा वाढणार
- ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना, ई श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदांनी होणार
- 23 आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता 65 हजाराहून 1.35 लाखांपर्यंत गेल्या 10 वर्षांत वाढली आहे. ही वाढ 100 टक्के इतकी आहे. 2014 नंतर सुरू झालेल्या पाच आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत. पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधाही वाढवल्या जातील.
- अटल टिंकरिंग लॅब – अशा ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

