(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Union Budget 2024 when and where to watch : देशाचं बजेट तुमच्या मोबाईलवर, अर्थसंकल्प कधी, कुठे पाहाल?
Union Budget 2024 when and where to watch : 1 फेब्रुवारीला सादर होत असलेलं देशाचं हे बजेट, देशाचा अर्थसंकल्प साध्या, सोप्या भाषेत तुम्ही एबीपी माझा वृत्तवाहिनीसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकणार आहात.
Union Budget 2024 when and where to watch : Budget 2024 : लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पूर्वी केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Govt Budget) आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचं बजेट (Budget 2024) सादर करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 (Union Budget 2024) संसदेत सादर करतील. निवडणुकीपूर्वीचं हे बजेट अंतरिम बजेट (Interim Budget) आहे. निवडणूक झाल्यानंतर नव्याने सत्तेत येणारं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर (General Budget) करेल. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प हा सामान्य अर्थसंकल्पापेक्षा पूर्ण वेगळा असतो. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार हे निश्चित आहे. जे लाभार्थी किंवा अनुदान घेणारा वर्ग आहे, अशा वर्गाला टार्गेट करत अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता आहे. राम मंदिरानंतर मोदी गॅरंटीवर भाजपने जोर दिला आहे. त्यामुळे बजेटमध्येही त्यावरच फोकस केला जाईल.
याशिवाय यंदा कररचना अर्थात टॅक्सस्लॅब (Tax Slab 2024) मध्ये काय बदल होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसंच अर्थमंत्री शेती, युवक, आणि विशेषत: महिला वर्गासाठीही भरघोस तरतुदी करण्याची शक्यता.
बजेट कधी कुठे पाहाल? (When and where to watch budget 2024)
1 फेब्रुवारीला सादर होत असलेलं देशाचं हे बजेट, देशाचा अर्थसंकल्प साध्या, सोप्या भाषेत तुम्ही एबीपी माझा वृत्तवाहिनीसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकणार आहात. तुमच्या मोबाईलवर बजेटचे अपडेट मिळू शकतील. त्यासाठी तुम्हाला marathi.abplive.com/ वर लॉग ऑन करावं लागेल.तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर बजेटचे सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळतील.
याशिवाय तुम्ही एबीपी माझाचे व्हॉट्सअॅप चॅनल, फेसबुक पेज, X अर्थात ट्विटर, शेअरचॅट, कू, थ्रेड, बजेटचे सर्व अपडेट्स मिळवू शकता.देशाचं संपूर्ण बजेट मराठीमध्ये तुम्ही एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह बघू शकाल. बजेट लाईव्ह आणि तज्ज्ञांचं विश्लेषण एकाचवेळी तुम्ही पाहू शकाल.
देशाचा अर्थसंकल्प 2024 (Interim Budget 2024)
अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्प 2024 (Budget 2024-25) निवडणुकीपूर्वी सादर होत आहे. त्यामध्ये वर्षभराचा संपूर्ण आढावा नसेल. निवडणूक वर्षात सामान्यत: नवं सरकार स्थापन होईपर्यंत चार महिन्यांसाठी प्रशासनिक कार्य आणि विकासकामांवरील खर्चाचा तपशील अंतरिम बजेटमध्ये सादर केला जातो. या बजेटबाबत मोदी सरकारने पूर्ण तयारी केली आहे.
अर्थसंकल्प 2024 भाषण कधी सुरु होईल? (When Budget speech 2024 start)
अर्थमंत्री निर्मला सीतारामणसंसदेत 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतील. सकाळी 11 वा. अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात होईल. यामध्ये अर्थमंत्री मागील वर्षात 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत काय झालं, किती जमा-खर्च झाला याचा तपशील सांगतील. त्यानंतर प्रत्यक्ष अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात होईल.
1999 पर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वा सादर करण्याची प्रथा होती, मात्र 1999 मध्ये माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली.
बजेट कसं सादर केलं जाईल? (How will the budget be presented?)
बजेट सादर करण्याची एक प्रथा आहे. या प्रथेनुसार सर्वप्रथम बजेट डॉक्युमेंट्स (Budget Documents) संसद भवनात आणले जातील. त्यानंतर कॅबिनेट बैठक होईल. या बैठकीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. या बैठकीत अर्थसंकल्पाबाबत महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय होतील. त्यानंतर अर्थमंत्री बजेट सादर करतील.
अर्थसंकल्प 2024 Live (Budget 2024 Live)
अर्थसंकल्प 2024 तुम्ही एबीपी माझा टीव्ही आणि वेबसाईट, सोशल मीडियावर साध्या सोप्या भाषेत समजून घेऊ शकता. याशिवाय अर्थमंत्रालयाची वेबसाईट, PIB, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बजेट पाहू शकाल.