एक्स्प्लोर

BMC Budget 2024: मुंबई महापालिकेचं यंदा 'इलेक्शन बजेट'; दुसऱ्यांदा प्रशासक अर्थसंकल्प सादर करणार, पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्रावर भर देण्याची शक्यता

BMC Budget 2024: मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत गेल्या 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून पालिकेच्या कारभाराचा गाडा आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या माध्यमातून हाकला जात आहे.

Mumbai Municipal Corporation Budget 2024-2025: मुंबई : मुंबई महापालिकेचा (BMC Budget 2024) आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget 2024-25) आज सादर होणार आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक (BMC Elections) डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे.

गेल्या वर्षीचा 52 हजार 619 कोटींचा अर्थसंकल्प यंदा 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्या आहेत, तर दुसरीकडे  उत्पन्नाचे नवे स्रोतही आटले आहेत. पण तरीही निवडणूक वर्ष डोळ्यांसमोर ठेऊन फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी, जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत सात मार्च 2022 रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यानं, यंदा सलग दुसर्‍या वर्षी प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

मुंबई महापालिकेचं यंदा 'इलेक्शन बजेट', बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे काय? 

मुंबईकरांवरची करवाढ टळणार

कोरोना काळात पालिकेने दोन वर्षे मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा टाकला नाही. त्यामुळे मालमत्ता करासारख्या करवाढीचे प्रस्ताव अंमलबजावणीविना पडून आहेत. मात्र आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा पडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'बेस्ट'साठी तरतूद 

या वर्षी 'बेस्ट' प्रशासनानं तीन हजार कोटी रुपये सहाय्य स्वरूपात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावर्षी पालिका ‘बेस्ट’ला किती मदत करते याकडे लक्ष लागले आहे

ठेवी घटल्याने अंतर्गत कर्जाचा पर्याय

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, सिमेंट काँक्रिट रस्ते, प्रस्तावित समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प अशा प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षभरात पालिकेच्या 92 हजार कोटींच्या  ठेवींमधील आठ हजार कोटींच्या ठेवी घटल्याने मोठ्या प्रकल्पांची देणी देण्यासाठी अंतर्गत कर्जाचा विचार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बजेटचा आकडा मोठा दिसेल.

मोठ्या प्रकल्पांकरता निधी

गेल्या वर्षीच्या 53 हजार कोटींच्या बजेटमध्ये 27247 कोटींच्या प्रकल्पांवर पालिका आयुक्तांनी 52 टक्के निधी ठेवला होता. यावेळी पालिका आयुक्तांनी बजेटमध्ये आणखी वाढ करून एकूण बजेटच्या 56 टक्के निधी प्रकल्पांवर खर्च केला जाईल अंदाज बांधला जात आहे.

पायाभूत सोयीसुविधांवर भर 

पाणी समस्या आणि स्वच्छतेवर भर देणार असून, मुंबईतील कचऱ्याची समस्या सोडवण्यासोबतच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यावर भर देणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईला खड्डेमुक्त करण्यावर विशेष लक्ष असेल. याकरता तरतुदी होण्याची शक्यता

बीएमसीची आर्थिक परिस्थिती हाताळण्याचं आव्हान

बीएमसीच्या रिकाम्या तिजोरीत पैसा कुठून येणार याची अर्थसंकल्पात तरतूद करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बीएमसीला मुदत ठेवींमधून पैसे काढावे लागतात. 2022 मध्ये बीएमसीच्या मुदत ठेवी 91690 कोटी रुपये होत्या. जे 2023 मध्ये अंदाजे 5000 कोटी रुपयांनी कमी होऊन 86410 कोटी रुपये झाले आहे. मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे, त्यामुळे बीएमसीला दरवर्षी 4500 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.  

स्वच्छता आणि सुशोभिकरणावर विशेष लक्ष

मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाकडून संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहिम राबवली जाते आहे. मुख्यमंत्री स्वतः मोहिमेत उतरून लक्ष देत आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीनंही विविध योजना राबवल्या जाणार आहेत. तसेच पाणी प्रकल्प, नवीन जलवाहिन्या टाकणे, शिक्षण, आरोग्य तसेच समुद्राचे पाणी गोडे करणे, कोळीवाड्य़ांचा विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, मार्केट, सिमेंट काँक्रिटिकरणाचे रस्ते, कचरा विल्हेवाटीसाठी योजना आदी प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget