Maharashtra Budget 2022 : छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव, पर्यटना विकासासाठी आणखी कोणत्या घोषणा?
Maharashtra Budget 2022 : जाणून घ्या अजित पवारांनी (Ajit Pawar) सादर केलेल्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी केलेल्या घोषणा
Maharashtra Budget 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) विधीमंडळात सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. पर्यटन विभागासाठी 1,704 कोटी आणि सांस्कृतिक विभागाला 193 कोटी देण्यात आले आहेत. यावेळी अजित पवारांनी कामांची दिशा स्पष्ट केली. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. जाणून घ्या अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागासाठी केलेल्या घोषणा
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव, जाणून घ्या आणखी घोषणा
-मुंबई पुणे नागपूर येथे हेरिटेज वॉक निर्माण करण्यात येईल.
-रायगड किल्याच्या जतन संवर्धनासाठी 100 कोटी रूपये निधी देण्यात आला आहे.
-शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
-कोयना, जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित असल्याचे पवारांनी अर्थसंकल्पादरम्यान सांगितले.
-जव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरीता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान.
-पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय "महावारसा" सोसायटीची स्थापना.
-बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात "आफ्रिकन सफारी" सुरु करणार.
-पुणे वन विभागात बिबट्या सफारी सुरु करणार.
बजेटमधील दहा महत्वाच्या घोषणा
हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील
जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद
मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार
तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार 8 कोटींची तरतूद
आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार
मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
15 हजार 773 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधण्यासाठी तर इमारत बांधण्यासाठी 1 हजार कोटी
एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
संबंधित बातम्या