(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Budget 2023 Saving Schemes For Women : अर्थसंकल्पात महिलांसाठी बचत योजनेची घोषणा. ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा
Budget 2023 Saving Schemes For Women : अर्थमंत्री निर्मल सीतारमण यांनी महिलांसाठी नव्या बचत योजनेची घोषणा केली आहे.
Budget 2023 Saving Schemes For Women : केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Niramal Sitharaman) यांनी ज्येष्ठ नागरीक आणि महिलांसाठीच्या बजत योजनेबाबत (Saving Schemes) मोठी घोषणा केली. अर्थसंकल्पात महिला बचत सन्मान पत्र (Mahila Samman Saving Certificate) योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना 7.5 टक्के दराने परतावा मिळणार आहे. ही बचत योजना दोन वर्षांसाठी असणार आहे. किसान विकास पत्रप्रमाणे ही योजना असण्याची शक्यता आहे.
महिलांसाठी बचत योजना
महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेत दोन वर्षांसाठी, 2025 पर्यंतच्या मुदतीसाठी गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेनुसार अधिकाधिक दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. या योजनेत महिलांना मुदत ठेव. पीपीएफ, एनएससी आणि आरडी सारख्या योजनेपेक्षा अधिक व्याज दर मिळणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे. तर, संयुक्त खात्यांसाठी ही मासिक उत्पन्न मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. ही मर्यादा 9 लाखांहून 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
जन-धन योजना खात्यासाठी व्हिडिओ KYC ची घोषणा
जन-धन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक KYC ची प्रक्रिया व्हिडिओ कॉलद्वारे पूर्ण केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, आता व्हिडिओ केवायसीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
वाहतूक सुलभ होण्यासाठी 75 हजार कोटींची तर शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद
देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आज काही तरतूदी करण्यात आल्या. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्टक्चर प्रोजेक्टसाठी 75 हजार कोटी रुपये तर अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जाणार आहेत.
> पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काय तरतूदी
- ट्रान्सपोर्ट इन्फ्रा प्रोजेक्टवर 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- अर्बन इन्फ्रा फंडासाठी दरवर्षी 10000 कोटी दिले जातील
- गटार साफ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मशीनवर आधारित असेल
- मिशन कर्मयोगी नागरी सेवकांची कार्यक्षमता वाढविण्याची घोषणा केली
इतर महत्त्वाच्या बातम्या: