Budget 2020 LIVE | काय स्वस्त, काय महाग?
LIVE
Background
Union Budget 2020 Live Updates : डळमळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीची वाढती समस्या पाहता मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा मध्यमवर्ग, व्यापाऱ्यांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या लाल खतावणीकडे देशाचं लक्ष आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात. निर्मला सीतारमण यांच्यासमोर अर्थसंकल्पात संतुलन कायम ठेवण्याचं आव्हान आहे. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात काय खास आहे, याचा तुमच्यावर काय परिणाम होणार? या अपडेट्ससाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com
सकाळी 11 वाजता बजेट सादर होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 8.50 वाजता घरातून बाहेर पडली. 9 वाजता अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांसोबत फोटोसेशन होईल. यानंतर अर्थसंकल्प 2020-21 सादर करण्यासंदर्भात औपचारिक परवानगी घेण्यासाठी त्या राष्ट्रपती भवनात जातील. राष्ट्रपती भवनातून अर्थमंत्री मंत्रिमंडळ बैठकीसाठी संसदेत जातील, तिथे अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. यानंतर निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता लोकसभा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.
टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता
अर्थसंकल्पात सर्वसामन्यांसाठी उत्सुकतेचा भाग असतो कर रचनेची घोषणा. यंदा मंदीमुळे महसुलात वाढ करणं आणि करामध्ये कपात करुन उत्पन्न वाढवणं हे अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे सरकार अर्थसंकल्पात टॅक्स रचनेाबत दिलासा देण्याची शक्यता आहे.
- पाच लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न करमुक्त होऊ शकतं.
- मागील वर्षी पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांनाच करमुक्त केलं होतं.
- परंतु ज्याचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता.
- सध्या अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर आकारला जातो.
- पाच ते दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जातो.
- दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारण्यात येतो.
- याशिवाय पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 12,500 रुपयांची सूट देण्यात आली होती. म्हणजेच पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही.
आर्थिक सर्वेक्षणात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019-2020 या आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण काल (31 जानेवारी) लोकसभेत सादर केलं आहे. या सर्वेक्षणात 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार चालू वर्षात आर्थिक विकासदर 5 टक्के राहू शकतो. त्यामुळे विकासदर वाढवण्यासाठी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागेल. आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे की, नवे व्यवसाय सुरु करण्यासाठी, मालमत्तेच्या नोंदणीसाठी, कर भरणे, कराराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी नवे उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
शेअर बाजार आज खुला राहणार
देशाचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार असल्याने शेअर बाजार आज पूर्ण दिवस खुला राहणार आहे आणि सामन्य कामकाज होणार. आज शनिवार आहे. शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतो. विशेष परिस्थितीत शेअर बाजार खुला राहतो. शेअर बाजार आज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
संबंधित बातम्या
संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, आर्थिक वर्षात विकासदर 6 ते 6.5 राहण्याचा अंदाज
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अखेरचा अर्थसंकल्प?
Budget 2020 | आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडे सर्वांचं लक्ष
Financial Budget | अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे |WEB EXCLUSIVE | ABP Majha