एक्स्प्लोर

जगातील अब्जाधीशांना मोठा झटका, बँकेच्या एका निर्णयाचा अनेकांना हादरा, संपत्तीत मोठी घट

जगातील अब्जाधीशांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं अब्जाधीशांना हा मोठा धक्का दिला आहे.

Billionaires wealth : जगातील अब्जाधीशांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं अब्जाधीशांना हा मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. सलग तीन वेळा दर कमी केल्यानंतर सेंट्रल बँकेने यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही. 

अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे, त्यामुळे तेथे धोरणात्मक पातळीवर जे काही बदल घडतात, त्याचा प्रभाव जगभर दिसून येतो. डोनाल्ड ट्रम्प देशाचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या निर्णयांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. दरम्यान, फेडच्या दरात कपात न करण्याच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीवरही दिसून येत आहे. फ्रान्सपासून अमेरिकेपर्यंतच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, यूएस सेंट्रल बँकेच्या निर्णयानंतर अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. निर्देशांकानुसार, या निर्णयानंतर फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट आणि एलोन मस्क यांच्या संपत्तीत घट झाली आहे. कोणत्या अब्जाधीशाच्या संपत्तीत नेमकी किती घट झाली याबाबतची माहिती जाणून घेऊयात. दरम्यान, अमेरिकेत झालेल्या आर्थिक घडमोडींचा मोठा फटका जगातील इतर देशांवर देखील होताना दिसत आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणाचा तर मोठा परिणाम इतर देशांवर होत असतो. यावेळी व्याजदरात कोणतीही कपात न केल्यामुळं अब्जाधिशांचं मोठं नुकसान झालं आहे. 

बर्नार्ड अर्नॉल्टचे सर्वाधिक नुकसान 

फेडच्या या निर्णयानंतर बर्नार्ड अर्नॉल्टला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, त्यांना सर्वाधिक 9.55 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 197 अब्ज डॉलर्स आहे.

एलन मस्कचेही मोठं नुकसान 

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे मित्र आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांचेही नुकसान झाले आहे. यूएस सेंट्रल बँकेच्या निर्णयानंतर अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीत 7.12 अब्ज डॉलरची घट झाली आहे. निर्देशांकानुसार त्यांची एकूण संपत्ती आता 421 अब्ज डॉलर्स आहे.

बेटेनकोर्ट मेयर्स यांच्या संपत्तीत 2.25 अब्ज डॉलरची घट 

तसेच फ्रेंच उद्योगपती फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांच्या संपत्तीत 2.25 अब्ज डॉलरची घट झाली आहे. फेडच्या घोषणेनंतर, अमेरिकन उद्योगपती लॅरी एलिसन, स्टीव्ह बाल्मर आणि बॉब दुग्गन यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये घट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget