एक्स्प्लोर

सोन्यानं गाठली विक्रमी पातळी, 3 दिवसात तब्बल 2800 रुपयांची वाढ; आजचा सोन्याचा दर काय?

सोने खरेदी (Gold Price) करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या काळात ही वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Gold Price : सोने खरेदी (Gold Price) करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या काळात ही वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आज सोन्याचा दर हा GST सह 66,800 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर हे 67 हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील दोन दिवसात जवळपास  सोन्याच्या दरात अडीच हजारांची वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर महागले आहेत. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अपेक्षेने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. 

तब्बल 2800 रुपयांची वाढ

गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तब्बल 2800 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर हे 66800 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. वाढत्या दरात सोने ग्राहकांनी मात्र सोने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र जळगाव सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यास सुरु केल्यानं, सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या मागे तब्बल दोन हजार आठशे रुपयांची वाढ तीन दिवसात झाली आहे. सोन्याचे दर हे 64800 तर GST सह 66800 रुपयांच्या वर जाऊन पोहोचली आहे.

सोने 70000 रुपयांवर जाण्याची शक्यता

जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकानी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याच्या दरात तीन दिवसात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसापूर्वी सोन्याचे दर GST सह 64100 होते तेच सोन्याचे दर आज तब्बल 66800 इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. आजवरचे सोन्याचे दर हे सर्वाधिक उंचीवर असल्याचं सोने व्यावसायिकांनी सांगितलं आहे. आगामी काळात अजूनही सोन्याचे दर वाढ होऊन 70000 हजार रुपयांच्यापर्यंत जाण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोन्याच्या या वाढत्या दरामुळं ग्राहकांचा फारसा प्रतिसाद सोने खरेदीसाठी नसल्याचे पाहायला मिळत आहे. घरात लग्नकार्य असल्यानं सोने खरेदी करणे गरजेचे असल्यानं काहीजण वाढत्या जरातही खरेदी करत आहेत. अचानक सोन्याच्या वाढत्या दरामुळं बजेट बिघडल्याची माहिती अनेक ग्राहकांनी दिली आहे.  सोने खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्यानं ग्राहकांनी खंत व्यक्त केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

गेल्या 48 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ, सध्या सोन्याला किती दर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget