एक्स्प्लोर

कांद्याचे दर वाढणार कधी? निर्यातबंदी हटवून 20 दिवस झाले तरीही दर जैसे थे, शेतकरी चिंतेत

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत आहे. कारण, कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. निर्यातबंदी उठवून आज 20 दिवस झाले तरी देखील कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत नाही.

Onion Price: सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत आहे. कारण, कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export ban) उठवून आज 20 दिवस झाले तरी देखील कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं दरात घट झाली आहे. निर्यातबंदी हटवली असली तरी सरकारनं निर्यातीवर दोन अटी घातल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा महाग झाला आहे, मात्र, परदेशात निर्यात होत नसल्याने देशांतर्गत बाजारात आवक वाढली आहे.

केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली खरी पण ती उठवताना काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यामुळं कांदा निर्यात करण्यास अडचणी निर्माण होत आहेत परिणामी देशात कांद्याचा पुरवठा जास्त होऊन दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.   सध्या शेतकऱ्यांना तोटा सहन करुन कंदा विकावा लागत आहे. आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा कवडीमोल भावाने विकत आहेत. 

शेतकऱ्यांची मागणी काय?

सरकारनं निर्यात खुली होऊनही शेतमालाला अतिशय कमी भाव मिळत आहे. त्यामुळे आता निर्यातीवर लादलेली 550 प्रति टन किमान निर्यात किंमत (MEP) आणि त्यावर लादलेले 40 टक्के निर्यात शुल्क काढून टाकण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या या मागणीवर सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कांद्याच्या दरात मोठी घसरण

मिळालेल्या माहितीनुसार, काल छत्रपती संभाजी नगरमधील शेतकऱ्यांना कांद्याचा किमान भाव केवळ 2 रुपये प्रति किलो इतका मिळाला. तर कमाल भाव 15 रुपये तर सरासरी 8.5 रुपये प्रति किलो होता. तिन्ही किमती किमतीपेक्षा कमी होत्या. कांद्याचा उत्पादन खर्च 18 रुपयांवरून 20 रुपये किलोपर्यंत वाढल्याचा दावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे 20 रुपयांपेक्षा कमी भाव असल्यास तोटा होतो. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. अकोल्यातही कांद्याला किमान किंमत 8 रुपये, कमाल 16 रुपये आणि सरासरी 12 रुपये प्रति किलो होती.

जाणून घेऊयात कोणत्या बाजारात कांद्याला किती भाव ?

छत्रपती संभाजीनगर - किमान 200 ते कमाल 1500 रुपये आणि सरासरी 850 रुपये प्रतिक्विंटल 
अकोला -  किमान 800 रुपये ते कमाल 1600 रुपये आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल
राहाता  - किमान भाव केवळ 250 रुपये प्रतिक्विंटल राहिला. कमाल भावही 2100 रुपये आणि सरासरी भाव 1500 रुपये प्रतिक्विंटल 
सोलापूर - किमान भाव केवळ 100 रुपये, कमाल 2500 रुपये आणि सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल होता.

महत्वाच्या बातम्या:

Bharti Pawar : ...तर कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार; भारती पवारांची गॅरंटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक
तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक
''उद्धव ठाकरे वडिलस्थानी, आम्हाला पदारात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो
''उद्धव ठाकरे वडिलस्थानी, आम्हाला पदारात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो
आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना
आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar :  मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर, वायकरांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखलABP Majha Headlines : 11 PM: 15 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVishal Patil and Vishwajeet Kadam on Majha Katta : विशाल पाटील, विश्वजीत कदम 'माझा कट्टा'वरABP Majha Headlines : 10 PM: 15 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक
तुळजाभवानी दानपेटी घोटाळा प्रकरण, न्यायालयाने आदेशानंतरही गुन्हा दाखल नाहीच; हिंदू जनजागृती समिती आक्रमक
''उद्धव ठाकरे वडिलस्थानी, आम्हाला पदारात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो
''उद्धव ठाकरे वडिलस्थानी, आम्हाला पदारात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो
आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना
आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण, इंदापूरची फॉर्च्यून डेअरी बंद ठेवण्याच्या सूचना
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... पहिल्याच दिवशीची शाळा सुटल्यानंतर फिरायला गेलेल्या 3 मुलींचा बुडून मृत्यू; गावावर शोककळा
महादेव बेटिंग ॲपप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यास अटक; सामान्य युवकाचा रुबाब, गाड्या, VIP वागणूक होती चर्चेत
महादेव बेटिंग ॲपप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यास अटक; सामान्य युवकाचा रुबाब, गाड्या, VIP वागणूक होती चर्चेत
Raksha Khadse : एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये पॅचअप होणार? मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या...
एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये पॅचअप होणार? मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या...
कोल्हापूरच्या कपिलेश्वर मंदिरात चोरी, भाविकांमध्ये खळबळ; पोलीस तपास सुरू
कोल्हापूरच्या कपिलेश्वर मंदिरात चोरी, भाविकांमध्ये खळबळ; पोलीस तपास सुरू
Video: आधी तिकडं बघितलं, मग जुनं गाणं म्हटलं, मित्रपक्षाला 'ठाकरेस्टाईल चिमटा'; शरद पवारांसह सर्वांनाच हसू
Video: आधी तिकडं बघितलं, मग जुनं गाणं म्हटलं, मित्रपक्षाला 'ठाकरेस्टाईल चिमटा'; शरद पवारांसह सर्वांनाच हसू
Embed widget