Bajaj Shares : बजाज ऑटो शेअर्सबाबत महत्त्वाची बातमी! बायबॅकची घोषणा होण्याची शक्यता
या आधी बजाज ऑटो कंपनीने 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये शेअर बायबॅक आणले होते.
मुंबई : ऑटो क्षेत्रातील दिग्गज बजाज ऑटो ही कंपनी आपल्या शेअरहोल्डर्ससाठी एक मोठी घोषणा करु शकते. आज कंपनीच्या बोर्डाची बैठक आहे आणि या बोर्ड मीटिंगमध्ये कंपनी शेअर बायबॅकबाबत काही घोषणा करू शकते. कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली होती. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ सभासद बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करतील.
एक्सचेंजकडे दाखल केलेल्या माहितीनुसार, कंपनीने सांगितले की बायबॅक सिक्युरिटीज रेग्युलेशन, 2018 नुसार, कंपनी 14 जून रोजी बोर्डाची बैठक घेत आहोत, ज्यामध्ये शेअर बायबॅकच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल. 9 जून ते 16 जून 2022 पर्यंत, कंपनीच्या स्टॉकवर या सिक्युरिटीमध्ये व्यवहार करण्यासाठी ट्रेडिंग विंडो बंद केली जाईल.
22 वर्षांपूर्वी कंपनीने बायबॅक केलं होतं
या आधी बजाज ऑटो कंपनीने 22 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये शेअर बायबॅक आणले होते. या दरम्यान, भागधारकांनी 18 दशलक्ष इक्विटी शेअर्सच्या बायबॅकला मान्यता दिली होती आणि यावेळी प्रत्येक शेअरची किंमत 400 रुपये निश्चित करण्यात आली होती.
2008 पासून लाभांश सुरु
बजाज ऑटो कंपनी 2008 पासून लाभांश देत आहे. दरवर्षी कंपनी लाभांशाची रक्कम वाढवते. आर्थिक वर्ष 2008 मध्ये, कंपनीने प्रति शेअर 20 रुपये दराने लाभांश घोषित केला होता, तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने प्रति शेअर 140 रुपये लाभांश घोषित केला होता.
कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल कसे होते?
अलीकडेच, कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल सादर केले. तथापि, मे महिन्यातील विक्रीची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवत होती. मार्च तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ नोंदवली होती. कंपनीला 1332 कोटी रुपयांच्या तुलनेत 1469 कोटी रुपयांचा नफा झाला.
महत्त्वाच्या बातम्या: