एक्स्प्लोर

राम मंदिर परिसरात लावणार 56 प्रजातींची रोपे, महाराष्ट्रातून 7 हजाराहून अधिक कुंड्या आणि रोपे दाखल

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 7 हजाराहून अधिक कुंड्या आणि विविध प्रकारची झाडे अयोध्येत पोहोचली आहेत.

Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर उद्घाटनाचा (Ayodhya Ram Mandir) सोहळा काही तासांवर आला आहे. उद्या (22 जानेवारी) राम मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 7 हजाराहून अधिक कुंड्या आणि विविध प्रकारची झाडे अयोध्येत पोहोचली आहेत. सध्या देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे. 

राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची झाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये अॅग्लोनेमा रेड-लिपस्टिक, पिंक, अलोकॅशिया ब्लॅक वेल्वेट- कुकुलटा, वेस्टिल, फिलोडेंड्रॉन रिंग ऑफ फायर-बर्किन, झेनाडू, रेड काँगो, पिंक फायर, पिंक प्रिन्सेस, डायफेनबॅचिया व्हाईट इत्यादी प्रमुख आहेत. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश वन विभागाच्या वतीने येथे अभिषेक कार्यक्रमासाठी रोपे असलेल्या कुंड्यांची सजावट करण्यात येत आहे. या कुंड्यांमध्ये विविध प्रकारची देशी-विदेशी फुले असतील.

22 जानेवारीला संपूर्ण राम मंदिर परिसर सजवला जाणार 

22 जानेवारीला संपूर्ण राम मंदिर परिसर सजवला जाणार आहे. फुलांच्या सजावटीबरोबरच येथे कुंड्याही बसविल्या जात आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातून साडेसात हजारांहून अधिक कुंड्या आणि झाडे आली आहेत. तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश वनविभागाच्या वतीने या परिसरात सजावट करण्यात येत आहे. झाडे आणि वनस्पतींच्या सुगंधाने पर्यटक मंत्रमुग्ध व्हावेत, हा उद्देश आहे. राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची रोपे लावली जात आहेत. यामध्ये अॅग्लोनेमा रेड-लिपस्टिक, पिंक, अलोकेशिया ब्लॅक वेल्वेट- कुकुलटा, वेस्टिल, फिलोडेंड्रॉन रिंग ऑफ फायर-बर्किन, झेनाडू, रेड काँगो, पिंक फायर, पिंक प्रिन्सेस, डायफेनबॅचिया व्हाईट, होमलोमेना ब्रॉन्झ, कॅलेडियम मिक्स, मेलपिघिया श्रीराम, ड्रॅकेना, ड्रॅकेना, सेफलेरा, व्हेरिगेटेड, लोरोपेटालम, रडार माचेरा, डायफेनबॅचिया बोमनी, मॉन्स्टेरा डेलिसिओसा, आर्केड मिक्स, पीस लिली इत्यादींचा समावेश आहे. 

नक्षत्र वाटिका

जन्मभूमी संकुलात स्थापन झालेल्या नक्षत्र वाटिकेचे सौंदर्यही थक्क करणारे आहे. हिरवाई लक्षात घेऊन नक्षत्र वाटिकेत तयार केलेली झाडे या ठिकाणचे सौंदर्य आणि वातावरण दिव्य बनवतील. रामजन्मभूमी संकुलात रामायण काळातील वैभव दाखविणाऱ्या नक्षत्र वाटिकेत 27 नक्षत्रांशी संबंधित 27 झाडे लावण्यात आली आहेत. राममंदिर परिसर हिरवागार असावा, यासाठी संपूर्ण प्रांगणातील हिरवळीची विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही नक्षत्र वाटिकेत रोपटे लावले होते. रामायण काळातील वृक्षांमध्ये पिंपळ, पाकड, कडुनिंब, गुटेल, महुआ, शिशम, खैर, पळस, बेल, माउलीश्री, शमी, कदंब, आंबा, अर्जुन, गुलार, साल, वड, आवळा आदी वृक्षांची रोपे आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ram Lalla Pran Pratishtha : 10 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शरयू नदीकाठावर 'रामज्योती'

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget