SBI Alert: चुकूनही 'या' लिंकवर करू नका क्लिक, बँक खाते होईल रिकामे
SBI Alert Customer: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर फसवणुकीबद्दल सूचना देत असते.
SBI Alert Customer: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सायबर फसवणुकीबद्दल सूचना देत असते. गेल्या काही वर्षांत लोक रोखीने व्यवहार करण्याऐवजी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आदींचा वापर करू लागले आहेत. वाढत्या डिजिटलायझेशनच्या युगात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. आजकाल सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक करत आहेत.
हे सायबर गुन्हेगार लोकांना विविध शॉपिंग ऑफर देऊन किंवा फिशिंग लिंक पाठवून त्यांची खाती आणि सर्व वैयक्तिक माहिती चोरतात. यानंतर ते खातेदाराचे सर्व पैसे त्यांच्या खात्यातून आपल्या खात्यात वळवतात. अशा परिस्थितीत लोकांचे कष्टाचे पैसे त्यांना न कळत चोरले जातात. स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना अशा फिशिंग लिंक्स आणि सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बँकेने ट्विटद्वारे दिली माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून माहिती शेअर करताना सांगितले आहे की, तुम्ही कोणत्याही शॉपिंग ऑफर, फिशिंग लिंक्स, कॅशबॅक रिवॉर्ड्स आणि बनावट ईमेल्सद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. अशा लिंकवर क्लिक केल्यावर तुमची वैयक्तिक माहिती गुन्हेगारांपर्यंत जाते. यानंतर, ऑफरचे आमिष दाखवून ते तुमचे बँक तपशील मिळवतात. त्यानंतर ते तुमच्या खात्यातील सर्व पैसे चोरतात.
I’ll trick you to click on me so that I can devour all your private information.
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 17, 2022
If you have recognised me, drop your answer in the comments section.#KnowYourFinanceWithSBI #AmritMahotsav #AzadiKaAmritMahotsavWithSBI pic.twitter.com/AVEpauVgUW
चुकूनही वैयक्तिक माहिती शेअर करू नका
- सायबर फसवणुकीपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमची वैयक्तिक माहिती पूर्णपणे कोणाशीही शेअर करू नका.
- कोणत्याही ऑफरच्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करून, त्या ऑफरची पडताळणी करा.
- तुमचा पॅन कार्ड तपशील, आधार तपशील (आधार कार्ड), डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड पिन, कार्ड नंबर कोणाशीही शेअर करू नका.
- टेलिकॉम कंपनीने केलेल्या कॉलवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.