एक्स्प्लोर

Alcohol Export: भारतातून मद्य निर्यात वाढणार, जगात मद्य उत्पादनांना मोठी मागणी, 1 अब्ज डॉलर्स महसूल मिळवण्याचं उद्दिष्ट

Alcohol Export News : भारतीय मद्य उत्पादनांना (Alcohol production) जगात मोठी मागणी आहे. या क्षेत्रात विकासाची संधी आहे

Alcohol Export News : भारतीय मद्य उत्पादनांना (Alcohol production) जगात मोठी मागणी आहे. या क्षेत्रात विकासाची संधी आहे. अपेडा (APEDA) अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न निर्यात विकास प्राधिकरणाने पुढील काही वर्षांमध्ये 1 अब्ज डॉलर्स निर्यात महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक (मद्य) आणि नॉन-अल्कोहोलिक (मद्य विरहित) पेयांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा एक भाग म्हणून अपेडाने परदेशातील प्रमुख देशांमध्ये भारतीय मद्य उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. मद्य निर्यातीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे.

भारतात राजस्थानमध्ये बनवण्यात आलेली गोदावन सिंगल माल्ट व्हिस्की, युनायटेड किंगडममध्ये आर्टिझन सिंगल माल्ट व्हिस्की म्हणून, प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय मद्य निर्यातीमधील हा महत्वाचा टप्पा ठरणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि डायजिओ पीएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेब्रा क्रू, अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, डियाजिओ इंडिया च्या एमडी आणि सीईओ हिना नागराजन, आणि इतर वरिष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत, गोदावनच्या पहिल्या तुकडीला युनायटेड किंग्डममधील निर्यातीसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना 'या' उपक्रमाचा लाभ मिळणार

गोदावन सिंगल माल्ट व्हिस्कीने मार्च 2024 मध्ये लंडनमधील इंटरनॅशनल फूड अँड ड्रिंक्स इव्हेंट (IFE) मध्ये अपेडा अंतर्गत सहभाग नोंदवला होता, गोदावनची जाहिरात केली होती. गोदावनचा यूकेमधील प्रवेश आणि यूकेला निर्यात होण्यामध्ये या सहभागाने मोलाची भूमिका बजावली आहे. अलवर भागातील शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळेल. गोदावनच्या उत्पादनासाठी वापरलेली ‘सिक्स-रो’ प्रकारची बार्ली, स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आली असून, उद्योगांना पुरवठा साखळीशी जोडल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत आहे. अल्कोहोलयुक्त पेयेची विक्री, वितरण आणि उत्पादनासाठी सरकारने जारी केलेले परवाने आवश्यक आहेत. हे परवाने नियामक साधन म्हणून काम करतात आणि सरकारला महसूल मिळवून देतात.

भारतीय अल्कोहोल उद्योग सरकारच्या महसूल प्रवाहात लक्षणीय योगदान देतो. हा महसूल तीन-पक्षीय दृष्टिकोनातून निर्माण केला जातो .

  • मूल्यवर्धित कर (VAT):  उत्पादन आणि वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर वस्तू आणि सेवांमध्ये जोडलेल्या मूल्यावर आकारला जाणारा कर .
  • उत्पादन शुल्क: अल्कोहोलयुक्त पेयांसह विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि वापरावर लावला जाणारा कर .
  • परवाने: अल्कोहोलयुक्त पेये तयार करणे, विक्री करणे आणि वितरीत करण्याच्या परवानग्यांसाठी शुल्क आकारले जाते.

महत्वाच्या बातम्या:

आता घरपोच मिळणार दारु? 'या' 6 राज्यांमध्ये प्रोजेक्टवर काम सुरु, मद्य उद्योगासाठी निर्णय ठरणार गेमचेंजर 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
'या' योजनेत करा गुंतवणूक, प्रत्येक तिमाहीत मिळवा 61 हजार 500 रुपयांचे व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती 
'या' योजनेत करा गुंतवणूक, प्रत्येक तिमाहीत मिळवा 61 हजार 500 रुपयांचे व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू

व्हिडीओ

Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Embed widget