एक्स्प्लोर

विमान प्रवाशांना झटका! दिल्ली-मुंबईसह सर्व व्यस्त मार्गांवर विमान प्रवास महागला

Airplane Rates : विमान इंधनाच्या (एटीएफ) किमती वाढल्याचा परिणाम आता विमानांच्या तिकीट किंमतीवर दिसू लागला आहे.

Air travel Rates : जेट विमानांच्या इंधनाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाल्याने व्यस्त मार्गावर विमान प्रवास महागला आहे. येत्या उन्हाळी हंगामासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची मागणी वाढू लागली असताना ही भाडेवाढ झाल्यानं आता नागरिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. विमान इंधनाच्या (एटीएफ) किमती वाढल्याचा परिणाम दिसू लागला आहे. ऑइल हिटचा प्रभाव कमी करण्यासाठी विमान कंपन्यांनी प्रवासी भाडे वाढवल्याचं कारण पुढे येत आहे. विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे काही मार्गांवर विमान भाडे जवळपास दुप्पट झाले आहे.

दिल्ली-मुंबई, हैदराबाद-दिल्ली आणि चेन्नई-दिल्ली या व्यस्त मार्गांवरील सरासरी भाडे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी वाढले आहे. 21 ते 31 मार्च दरम्यान भारतातील सर्वात व्यस्त मार्ग, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करणार्‍या प्रवाशांना एकेरी तिकीट भाडे सुमारे 7,956 रुपये द्यावे लागतील. ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल Ixigo वरील डेटा दर्शवितो की हे भाडे एका वर्षापूर्वीच्या भाड्यापेक्षा जवळपास 60% जास्त आहे.

मागणीवर परिणाम नाही

याच कालावधीसाठी हैदराबाद-दिल्ली, चेन्नई-दिल्ली आणि मुंबई-बेंगळुरू मार्गावरील फ्लाइट्ससाठी एकतर्फी तिकिटांची किंमत अनुक्रमे 8,253 रुपये, 9,767 रुपये आणि 6,469 रुपये आहे. हा दर एका वर्षापूर्वीच्या भाड्यापेक्षा अनुक्रमे 60%, 64% आणि 44% अधिक आहे. कोलकाता-दिल्लीच्या भाड्यात 43 टक्के आणि दिल्ली-बेंगळुरूच्या भाड्यात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हवाई इंधन दरात सहाव्यांदा वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या (ATF) किमती वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात हवाई इंधनाच्या किमतीत ऐतिहासिक उडी मारली गेली आणि पेट्रोलियम कंपन्यांनी एटीएफच्या किमती 17,135.63 रुपये प्रति किलोलीटरने वाढवल्या. दिल्लीत ATF 18.3 टक्क्यांनी महाग झाला आहे आणि नवीन किंमत 1,10,666 रुपये प्रति किलोलीटर आहे. कोलकाता येथे जेट इंधनाची किंमत 1,14,979 रुपये प्रति किलोलिटर आहे. चेन्नईमध्ये 1,14,133 रुपये, दिल्लीमध्ये 1,10,666 रुपये आणि मुंबईत 109,119 रुपये प्रति किलोलीटर आहे. यावर्षी सहाव्यांदा एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
Cidco Lottery 2026 :  सिडकोची EWS साठी 4779 घरांची लॉटरी, 23.50 ते 43.50 लाखांमध्ये घरं मिळणार,15 ऑगस्टपासून नोंदणी
सिडकोची EWS साठी 4779 घरांची लॉटरी, 23.50 ते 43.50 लाखांमध्ये घरं मिळणार,15 ऑगस्टपासून नोंदणी
UPI Transaction Charges : तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
तुमच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार? सरकारचे दोन नवे फॉर्म्युले; दुकानदारांवर काय होणार परिणाम?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget