क्या राम, क्या रहीम, सब एक है, राम मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाकडून 2.5 कोटींची जमीन दान!
उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या राम मंदिराचे काम जोमात सुरु असताना आता बिहारमध्येही एक भव्य असे ‘विराट रामायण मंदिर’ तयार केले जात आहे..
Ram Mandir in Bihar : भारत देशात विविधतेत एकता असल्याचं आपण लहानपणीपासून ऐकतो. पण याच वाक्याचं जिवंत उदाहरण बिहारमधून समोर येत आहे. बिहारमधील एका मुस्लिम परिवाराने चंपारण जिल्ह्यातील कैथवलियामध्ये तयार होणाऱ्या एका मंदिरासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. एकीकडे देशांत धर्म, जातीवरुन तणावाचं वातावरण पाहायला मिळत असताना समोर आलेलं हे उदाहरण खरचं भारताला एक महान देश बनवणारं आहे.
एकीकडे उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथे राम मंदिराचं काम सुरु असताना आता दुसरीकडे बिहारमध्ये जगातील सर्वात मोठ्या अशा विराट राम मंदिराचं काम सुरु आहे. दरम्यान हे मंदिर बनत असलेल्या जमीनीबाबत सोमवारी पटनाच्या महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या मंदिरासाठी इश्तियाक अहमद खान यांनी 2.5 कोटी रुपयांची त्यांची जमीन दान करण्याचा निर्णय घेतला आहे. इश्तियाक हे आधी चंपारण येथे राहत असून आता गुवाहाटी येथे व्यवसाय करतात.
डोळे दिपवणारं राम मंदिर
उत्तर प्रदेशच्या अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता बिहारमध्ये तयार होणारं हे ‘विराट रामायण मंदिर’ तितकचं खास आहे. कारण या मंदिराच्या बनण्यापूर्वी समोर आलेले त्याच्या फोटोतून मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे. हे विराट रामायण मंदिर जगातील सर्वप्रसिद्ध आणि 12 व्या शतकातील अंगकोरवाट मंदिरापेक्षाही अधिक लांब असणार आहे. या मंदिरासाठी जवळपास 500 कोटी इतका खर्च येणार आहे. विशेष म्हणजे हे रामायण मंदिर 270 फुट उंच असणार असून 1080 फुूट लांबा आणि 540 फुट रुंद असणार आहे. या मंदिराचा निर्माण अशाप्रकारे केला जात आहे, जेणेकरुन हे मंदिर येणाऱ्या 250 वर्षांपर्यंत टिकून राहिल. मंदिराच्या निर्माणासाठी केंद्रीय लोक निर्माण विभागाचे पूर्व महा निदेशक विनीत जायसवाल यांना मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.
हे ही वाचा :
- The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!
- Sana Khan : दुबई भ्रमंतीत सना खानने घेतला 24 कॅरेट चहाचा आस्वाद! बुर्ज खलीफाच्या 'या' चहाची किंमत ऐकलीत?
- Ambernath Crime News : धक्कादायक! जादूटोणा करण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha