आदित्य बिर्ला देणार टाटा समूहाला टक्कर, लवकरच 'या' नवीन क्षेत्रात पदार्पण; 5000 कोटींची गुंतवणूक करणार
आदित्य बिर्ला समूहानं (Aditya Birla Group) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता बिर्ला समूह ब्रँडेड दागिन्यांच्या किरकोळ व्यवसायात प्रवेश करणार आहे.
Aditya Birla Group : आदित्य बिर्ला समूहानं (Aditya Birla Group) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता बिर्ला समूह ब्रँडेड दागिन्यांच्या किरकोळ व्यवसायात प्रवेश करणार आहे. आदित्य बिर्ला समूहाने नॉव्हेल ज्वेल्स नावाच्या नवीन उपक्रमांतर्गत हा व्यवसाय केला जाणार आहे. हा ज्वेलरी ब्रँड यावर्षी जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळं आता आदित्य बिर्ला यांची टाटा समुहाशी (Tata Group) स्पर्धा होणार आहे.
दरम्यान, कपडे आणि शूजच्या व्यवसायानंतर आदित्य बिर्ला समूहाने टाटांशी स्पर्धा करण्यासाठी ब्रँडेड दागिन्यांच्या किरकोळ व्यवसायात प्रवेश केला आहे. यासाठी समूह सुमारे 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. आदित्य बिर्ला समूह नॉव्हेल ज्वेल्स नावाच्या नवीन उपक्रमांतर्गत हा व्यवसाय करणार असल्याचे जाहीर केले आहे. बिर्ला समूह आपल्या इन-हाउस ब्रँडसह या व्यवसायांतर्गत संपूर्ण भारतात मोठ्या स्वरूपातील ज्वेलरी रिटेल स्टोअर तयार करेल. आदित्य बिर्लाचा ज्वेलरी ब्रँड यावर्षी जुलैपासून सुरू होणार आहे.
बिर्ला समुहाचा तिसऱ्या व्यवसायात प्रवेश
गेल्या दोन वर्षांत पेंट आणि बांधकाम साहित्यासाठी B2B ई-कॉमर्सनंतर ग्रुपचा तिसऱ्या नवीन व्यवसायात प्रवेश आहे. फायबरपासून वित्तीय सेवांपर्यंतच्या व्यवसायात गुंतलेल्या या समूहाला दागिन्यांमध्ये राष्ट्रीय ब्रँड तयार करायचा आहे. टाटांच्या तनिष्क, कल्याण ज्वेलर्स आणि जोआलुक्का यासारख्या विद्यमान प्रस्थापित कंपन्यांशी ते इतर ब्रँडसह स्पर्धा करणार आहे.
2025 पर्यंत भारतातील दागिन्यांची बाजारपेठ 90 अब्ज डॉलरपर्यंत वाढणार
ब्रँडेड ज्वेलरी किरकोळ उपक्रमासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करण्यात आली आहे, असे समूहाने म्हटले आहे. भारताच्या रत्न आणि दागिन्यांच्या बाजारपेठेचा देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 7 टक्के वाटा आहे. 2025 पर्यंत भारतातील दागिन्यांची बाजारपेठ 90 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या दागिन्यांसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे आणि सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांचीही निर्यात करतो.
सोन्याच्या बाजारात झपाट्यानं वाढ
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या बाजाराच्या झपाट्याने वाढ होत आहे. अनौपचारिक क्षेत्राकडून औपचारिक क्षेत्राकडे संक्रमण होत आहे. हा समूह योग्य वेळी या बाजारात दाखल होत आहे. जे भारतीय ग्राहकांना उत्कृष्ट डिझाइनसह ज्वेलरी देण्यासाठी तयार आहे. आदित्य बिर्ला समूहाचा व्यवसाय धातू, लगदा आणि फायबर, सिमेंट, रसायन, कापड, कार्बन ब्लॅक, वित्तीय सेवा, फॅशन रिटेल, अक्षय ऊर्जा आणि व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
महत्वाच्या बातम्या: