एक्स्प्लोर

Adani Group : अदानी समूहाच्या अडचणी वाढणार? सेबीच्या चौकशीत आढळली 'ही' चूक

SEBI Report On Adani Group : अदानी समूहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. बाजार नियामक असलेल्या सेबीला अदानी समुहाच्या व्यवहारात काही चुका आढळल्या आहेत.

नवी दिल्ली:  हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या (Adani Group) व्यवहारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शेअर बाजारातही (Share Market) त्याचे पडसाद अनेक दिवस उमटत होते. आता, अदानी समूहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. बाजार नियामक असलेल्या सेबीला (SEBI) डिस्क्लोजरशी संबंधित नियमांचे उल्लंघन आणि ऑफशोअर फंड्सच्या होल्डिंग मर्यादेबाबतचे अदानी समूहाने उल्लंघन केले असल्याचे आढळून आले आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दोन सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 

अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg) या वर्षी जानेवारीमध्ये उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाच्या व्यवहारांवर एक अहवाल प्रकाशित करून कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या अहवालानंतर, अदानी समूहाचे बाजार मूल्य सुमारे 100 अब्ज डॉलरने कमी झाले होते. देशातही अदानींच्या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सेबीकडून चौकशी सुरू करण्यात आली. बंदरांपासून वीजनिर्मितीपर्यंतचा व्यवसाय करणाऱ्या अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

'सेबी'च्या चौकशी अहवालाशी सूत्रांनी सांगितले की, अदानी समूहाकडून झालेले हे उल्लंघन "तांत्रिक" स्वरूपाचे आहेत आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर आर्थिक दंडाच्या पलीकडे कोणतीही कारवाई होणार नाही. सेबीचा हा तपास सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली होत असून मंगळवारी 29 मे रोजी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

अहवालाशी संबंधित दुसऱ्या सूत्राने 'रॉयटर्स'ला सांगितले की, सेबीचा अहवाल सार्वजनिक करण्याची सध्या कोणताही विचार नाही. या संपूर्ण प्रकरणाचा आदेश पारित करण्यासोबतच ते सर्व अहवाल सार्वजनिक करणार आहेत.

याआधी शुक्रवार, 25 ऑगस्ट रोजी सेबीने अदानी समूहाच्या व्यवहारांची चौकशी जवळपास पूर्ण केली असल्याचे सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे. तपासात काही निष्कर्ष हे व्यवहाराच्या नियमांच्या उल्लंघनाशी निगडीत आहेत. 

सेबीने कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, त्यांनी काही व्यवहारांची चौकशी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक कंपनीकडून उल्लंघन केलेल्या प्रत्येक उल्लंघनावर दंड म्हणून अधिकाधिक एक कोटींचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 
 
अदानी समूहातील काही कंपन्यांमध्ये ऑफशोअर फंड हे नियमांनुसार नव्हते. भारतीय कायद्यानुसार, ऑफशोअर गुंतवणूकदार FPI च्या माध्यमातून कमाल 10 टक्के गुंतवणूक करू शकतात. त्याहून अधिक गुंतवणूक ही प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक म्हणून गृहीत धरली जाते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget