Railway Employees : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, महागाई भत्त्यात वाढ; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली आहे. रेल्वे विभागानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
Railway Employees DA Hike : यावर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड होणार आहे. दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली आहे. रेल्वे विभागानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. हा नवीन भत्ता 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे. दरम्यान, 23 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अखिल भारतीय रेल्वे आणि उत्पादन युनिट्सचे महाव्यवस्थापक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी निर्णय घेतला आहे की आता डीए 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात येईल.
वाढीव पगार कधी मिळणार?
जुलै 2023 पासून आतापर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने आपल्या अधिसूचनेत दिली आहे. ही थकबाकी पुढील महिन्याच्या पगारीसह जमा केली जाईल. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यात होणारी वाढ जुलै 2023 पासून प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ही वाढ मिळणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार होता. आता कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळू लागले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वे बोर्डाच्या या निर्णयानंतर रेल्वे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनचे सरचिटणीस एम राघवैय्या यांनी या निर्णयानंतर म्हटले आहे की, हा निर्णय केवळ महागाई दराच्या आधारावर घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांवर महागाईचा कोणताही परिणाम होऊ नये, हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
दिवाळी बोनसही जाहीर
DA वाढवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णयापूर्वी केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही जाहीर केला आहे. केंद्र सरकारने गट क आणि बिगर गॅझेट गट ब अधिकाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला होता. केंद्र सरकारने या बोनसची कमाल मर्यादा 7,000 रुपये निश्चित केली आहे. या बोनससाठी 15,000 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत.
मोदी सरकारकडून बोनस जाहीर
पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (अॅड-हॉक बोनस) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (नॉन-राजपत्रित कर्मचारी), जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: