2000 Rupee Notes: 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची आज शेवटची संधी, उरले फक्त काही तास
तुमच्याकडे जर 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या आजच्या आजच बदलून घ्या. कारण उद्या त्या नोटा तुम्हाला बदलून मिळणार नाहीत.

2000 Rupee Notes: तुमच्याकडे जर 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या आजच्या आजच बदलून घ्या. कारण उद्या त्या नोटा तुम्हाला बदलून मिळणार नाहीत. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. त्यामुळं 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तुमच्याकडे अवघे काही तासच शिल्लक आहेत.
उद्यापासून 2000 रुपयांची नोट व्यवहारात वापरता येणार नाही
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (1 ऑक्टोबर) 2000 रुपयांच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत. सोबतच सर्क्युलेशनमधून देखील दोन हजार रुपयांची नोट बाद होणार आहे. दरम्यान, सर्क्युलेशनमधून जरी दोन हजार रुपयांची नोट बाहेर काढली जाणार असली तरी ती लिगल टेंडर ग्राह्य धरली जाणार आहे. मात्र व्यवहारात वापरता येणार नाही. दोन हजार रुपयांची नोट उद्यापासून बदलता येणार की नाही याबाबत मात्र अजूनही स्पष्टता नाही. 1 सप्टेंबर रोजी आरबीआयकडून दोन हजार रुपयाच्या नोटांसंदर्भात माहिती जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये मे महिन्यापासून 93 टक्के दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंकिंग सिस्टिममध्ये परतल्या होत्या. आरबीआयकडून ‘क्लीन नोट पॉलिसी’च्या अनुषंगाने चलनातील नोटा बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
19 मे 2023 रोजी घेतला होता RBI ने निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने लोकांना 4 महिन्यांची मुदत दिली होती. जेणेकरून ते त्यांच्या बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या जुन्या नोटा सहज बदलू शकतील. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 म्हणजेच आज संपत आहे. जर तुम्ही हे काम अजून केले नसेल तर आज तुमची शेवटची संधी आहे. रिझर्व्ह बँकेने एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्याच 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची मर्यादा घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
External Debt: भारतावर विदेशी कर्जाचा डोंगर! मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ; वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
