एक्स्प्लोर

External Debt: भारतावर विदेशी कर्जाचा डोंगर! मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ; वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

भारतावरील परदेशी कर्जाचा (Overseas Debt) डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात भारतावर असणाऱ्या एकूण विदेशी कर्जात वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Indias Overseas Debt: भारतावरील परदेशी कर्जाचा (Overseas Debt) डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात भारतावर असणाऱ्या एकूण विदेशी कर्जात वाढ झाल्याचे समोर आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनं जारी केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, जून 2023 पर्यंत भारताचे एकूण बाह्य कर्ज 629 अब्ज डॉलर होते. हे कर्ज मागील वर्षीच्या तुलनेत वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाह्य कर्जापेक्षा 2.7 टक्के अधिक आहे. तर या कालावधीत एनआरआय ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे.

कर्ज वाढण्याचं मुख्य कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, गेल्या एका वर्षात परदेशी कर्ज वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे एनआरआय ठेवींमध्ये झालेली लक्षणीय वाढ. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, या काळात विदेशी कर्जाला कारणीभूत असलेले इतर सर्व घटक जवळपास स्थिर राहिले आहेत. सेंट्रल बँक सोडल्यास, अनिवासी भारतीयांच्या ठेवी मुख्यतः ठेवी घेणार्‍या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून येतात आणि त्यांची कर्ज म्हणून गणना केली जाते.

एनआरआय ठेवी वाढल्या कशा?

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, जून तिमाहीत अशा ठेवी 6.5 टक्क्यांनी वाढून $167 अब्ज झाल्या आहेत. एक वर्षापूर्वी, म्हणजेच जून 2022 च्या तिमाहीच्या समाप्तीनंतर, हा आकडा $157 अब्ज होता. तर बिगर-वित्तीय कॉर्पोरेशन्सच्या ठेवी $250 बिलियनवर स्थिर राहिल्या. सर्वसाधारण सरकारी कर्ज कमी झाले आहे, तर गैर-सरकारी कर्ज वाढले आहे, असेही या आकडेवारीवरून दिसून येते.

परकीय कर्जामध्ये अमेरिकेचा वाटा सर्वाधिक

भारताच्या एकूण परकीय कर्जामध्ये अमेरिकन डॉलर मूल्यांकित कर्जाचा वाटा सर्वात मोठा आहे. जून 2023 च्या तिमाहीच्या समाप्तीनंतर, त्यांचा हिस्सा 54.4 टक्के होता. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय रुपयातील कर्ज आहे. ज्याचा हिस्सा सध्या 30.4 टक्के आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकन रँड 5.7 टक्के योगदानासह तिसऱ्या स्थानावर, जपानी येन 5.7 टक्के योगदानासह चौथ्या स्थानावर आणि युरो 3 टक्के योगदानासह पाचव्या स्थानावर आहे.

बाह्य कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण घटलं

जून तिमाहीत बाह्य कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण मार्च 2023 तिमाही संपल्यानंतर 18.8 टक्के होते, जे जून तिमाहीच्या अखेरीस 18.6 टक्क्यांपर्यंत खाली आले. या कालावधीत कर्ज सेवेत म्हणजेच कर्ज भरणामध्ये चांगली वाढ झाली आहे. मार्च 2023 अखेर 5.3 टक्के होता, जो जून 2023 अखेर 6.8 टक्के झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

PM Mudra Loan: व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय, 'या' योजनेअंतर्गत मिळणार 10 लाखांचं कर्ज; जाणून घ्या प्रक्रिया 

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget