एक्स्प्लोर

2000 Rupee Notes: 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी उरले फक्त चार दिवस शिल्लक, अद्यापही 24 हजार कोटी जमा होणं बाकी

तुमच्याकडे जर 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या लवकर बदलून घ्या. कारण 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अवघे चारच दिवस शिल्लक राहीले आहेत.

2000 Rupee Notes: तुमच्याकडे जर 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या लवकर बदलून घ्या. कारण 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी अवघे चारच दिवस शिल्लक राहीले आहेत. जर तुम्ही 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या किंवा जमा केल्या नाहीत तर तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. अद्यापही सर्वसामान्य लोकांकडून 2000 रुपयांच्या नोटा येणं बाकी आहे. 24 हजार कोटी रुपयांच्या बँकेत परत येणं बाकी आहे. 

24,000 कोटी रुपयांच्या नोटा अद्याप परत करायच्या बाकी

रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ज्या 19 मे 2023 रोजी 3.56 लाख कोटी रुपयांवर आल्या होत्या. गेल्यावेळी, 1 सप्टेंबर 2023 रोजी, RBI ने नोटा परत करण्याबाबत डेटा जारी केला होता, त्यानुसार 3.32 लाख कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या होत्या. म्हणजेच चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 93 टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत. 2000 रुपयांच्या 7 टक्के म्हणजेच 24,000 कोटी रुपयांच्या नोटा अद्याप परत करायच्या आहेत.

30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा असणाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात

2000 च्या नोटा मागे घेण्याची घोषणा करताना RBI ने 30 सप्टेंबर 2023 नंतर देखील 2000 च्या नोटा कायदेशीर राहतील असे सांगितले होते. पण 30 सप्टेंबरनंतर बँका 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी स्वीकारतील की नाही करतील हे आरबीआयने सांगितलेले नाही. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्यांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून द्याव्यात किंवा जमा कराव्यात, असे आवाहन आरबीआय वारंवार करत आहे. त्यामुळं 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांमध्ये परत न आल्यास 30 सप्टेंबरनंतर या नोटा असणाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात. रिझव्‍‌र्ह बँकेने 19 मे रोजी अचानकपणे 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. परंतु अशी नोटा खात्यात जमा करण्यासाठी किंवा बँकांमध्ये बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली. दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेणे ही लोकांची गैरसोय टाळण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेत कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी नियोजित चलन व्यवस्थापनाचा एक भाग होता. 

का घेतला निर्णय?

2000 रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती.  सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Rs 2000 Note : 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी मुदतवाढ मिळणार? अर्थ मंत्रालयाने म्हटले....

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget